ढगाळ हवामानामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचे हेलिकॉप्टर ओझरला उतरले 

residentional photo
residentional photo

नाशिकः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हेलिकॉप्टरला आज ढगाळ हवामानामुळे तातडीचे लॅण्डींग करावे लागले. ऐनवेळी जामखेड व अकोला येथील जाहीसभा रद्द करुन श्री शाह यांना माघारी फिरावे लागले. 

श्री शाह यांच्या आज भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जामखेड व अकोला येथे जाहीरसभा असल्याने त्यांचा दौरा होता. मात्र आजच्या ढगाळ हवामानामुळे दुपारी त्यांच्या वैमानिकाने हेलिकॉप्टर पुढे नेण्यात अडचणी असल्याने लक्षात घेउन दुपारी दिडला ओझर विमानतळावर हेलिकॉप्टर उतरविण्याची सुचना दिली. अति विशेष सुरक्षेचा दर्जा असलेल्या केंद्रीय गृहमंत्री हेलिकॉप्टर प्रवास ढगाळ हवामानाने उड्डाण करु शकत नसल्याचे लक्षात येताच जिल्ह्यातील पोलिस यंत्रणांनी सर्तक होत त्वरीत विमानतळावर धाव घेतली. दुपारी एक वाजून 55 मिनीटांनी त्यांचे हेलिकॉप्टर उतरले. 

ओझर विमानतळावर साधारण तासाभराच्या प्रतिक्षेनंतर 3 वाजून 50 मिनीटानी हेलिकॉप्टरने शिर्डीसाठी उड्डाण केले. त्यानंतर चारला शिर्डीहून त्यांचे विमान परस्पर दिल्लीला गेले. ढगाळ हवामानामुळे प्रचारसभा अर्धवट सोडून त्यांचे हेलिकॉप्टर रवाना झाले. साधारण एक तासाभराच्या ढगाळ हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर विमातळावर थांबून होते. ढगाळ हवामान निवाळल्यानंतर श्री शहा यांचे विमान ओझर विमानतळावरुन शिर्डीला व तेथून दिल्लीला ते रवाना झाले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com