आमीर खान यांचे जवखेडा येथे आगमन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

 अमळनेर : पाणी फाऊंडेशनतर्फे सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेनिमित्त अभिनेते आमीर खान, श्रीमती किरण राव यांचे जवखेडा (ता. अमळनेर) येथे आज सकाळी आगमन झाले. अहिराणी गीताने ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. 

 अमळनेर : पाणी फाऊंडेशनतर्फे सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेनिमित्त अभिनेते आमीर खान, श्रीमती किरण राव यांचे जवखेडा (ता. अमळनेर) येथे आज सकाळी आगमन झाले. अहिराणी गीताने ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. 
जवखेडा येथे आज सकाळी साडेनऊच्या सुमारास अभिनेते आमीर खान, श्रीमती किरण राव यांचे आगमन झाले. यावेळी 'चैत्र महिनामा आम्ही जागरूक व्हयना रे' या अहिराणी गीताने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना फेटे बांधून त्यांचे औक्षणही करण्यात आले. श्रमदानासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, तहसीलदार प्रदीप पाटील आदींसह विविध खात्यांचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित आहेत. यावेळी जवखेडासह परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. यानंतर अभिनेता आमीर खान यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून श्रमदानाद्वारे पाणी अडविण्याचे आवाहन केले. 
 
Web Title: marathi news amlaner aamir khan pani foundetion