बाबा बोहरी खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार कैलास नवघरे पोलिसांच्या जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

अमळनेर : बाबा बोहरी खूनप्रकरणातील म्होरक्‍या कैलास नवघरे याला जळगाव स्थानिक पोलिस शाखेच्या पथकाने घाटकोपर (मुंबई) येथून आज सकाळी अकराला ताब्यात घेतले आहे. गेल्या वीस दिवसापासून तो फरारी होता. 

अमळनेर : बाबा बोहरी खूनप्रकरणातील म्होरक्‍या कैलास नवघरे याला जळगाव स्थानिक पोलिस शाखेच्या पथकाने घाटकोपर (मुंबई) येथून आज सकाळी अकराला ताब्यात घेतले आहे. गेल्या वीस दिवसापासून तो फरारी होता. 
बाबा बोहरी खूनप्रकरणी काही दिवसांपूर्वी वाशिम येथून तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होत. त्यांची कसून चौकशी केली असता या घटनेतील प्रमुख सूत्रधार कैलास नवघरे यानेच बाबा बोहरीवर गोळी झाडल्याची माहिती मिळाली होती. मात्र, कैलास नवघरे हा फरारीच होता. त्याच्या शोधासाठी ठिकठिकाणी पथक रवाना करण्यात आले होते. पोलिसांनी माहिती देणाऱ्यास वीस हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. आज सकाळी अकराला घाटकोपर येथून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने त्यास शिताफीने ताब्यात घेतले. रात्री सायंकाळी उशिरापर्यंत त्यास जळगाव येथे आणण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Web Title: marathi news amlaner bohri murder police