पेट्रोलपंप चालकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांचा तपास संथगतीने

योगेश महाजन
शुक्रवार, 4 मे 2018

अमळनेर : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बोरी पेट्रोलपंपाचे चालक अजगर अली उर्फ बाबा बोहरी यांची गुरुवारी (ता. 3) मध्यरात्री बाराच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेस तेरा तास उलटूनही संशयित आरोपी फरारी आहे. पोलिसांचा तपास संथगतीने सुरू असून मारेकऱ्याचा शोध घेण्यास त्यांना अपयश आले आहे. 

अमळनेर : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बोरी पेट्रोलपंपाचे चालक अजगर अली उर्फ बाबा बोहरी यांची गुरुवारी (ता. 3) मध्यरात्री बाराच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेस तेरा तास उलटूनही संशयित आरोपी फरारी आहे. पोलिसांचा तपास संथगतीने सुरू असून मारेकऱ्याचा शोध घेण्यास त्यांना अपयश आले आहे. 
शिवाजी उद्यानाजवळ बोहरी पेट्रोलपंप आहे. बाबा बोहरी पेट्रोलपंपावरील हिशोब करून ते दुचाकीने घराकडे निघाले होते. यावेळी चार ते पाच मारेकरी दबा धरून बसले होते. त्यांनी बोहरी यांच्यावर गोळी झाडली. अशा अवस्थेत बोहरी हे पेट्रोलपंपावर येऊन त्यांनी कर्मचाऱ्यांना आपल्यावर गोळी झाडल्याची माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी त्यांना डॉ. निखिल बहुगुणे यांच्याकडे दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. 
 
पोलिस यंत्रणेचे अपयश 
शहरात दोन महिन्यात दुसरी घटना असून अद्याप प्रा. दीपक पाटील यांच्या मारेकऱ्यास शोधण्यास पोलिस यंत्रणा अपयशी ठरली आहे. त्यातच बाबा बोहरी यांच्यावर गोळी झाडणारे मारेकरी बारा तास उलटूनही भरारीच आहेत. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले असून दोन्ही गुन्ह्यातील मारेकरी लवकर जेरबंद करावेत, अशी मागणी शहरवासियांकडून होत आहे. 
 
अप्पर पोलिस अधीक्षकांची भेट 
घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. याप्रकरणी जळगाव गुन्हे अन्वेषण पथकासही पाचारण करण्यात आले आहे. मात्र, तरीही तपास शून्य असल्याने स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांविषयी शहरवासियांमध्ये नाराजी व्यक्‍त होत आहे. 
 
पैशांसाठी हत्या..? 
बाबा बोहरी यांची हत्या पैशांच्या लुटीसाठी झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे. मात्र, मारेकऱ्यांना त्यांच्या जवळील रोख रक्कम लुटता आली नाही. ही घटना पूर्ववमनस्यातून घडली असावी, असीही चर्चा शहरात होत आहे. 
 
दोन महिन्यात दुसरी घटना 
शहरात 4 मार्चला प्रा. दीपक देवराम पाटील यांचा खून झाला होता. दोन महिने उलटत नाही, तोवर दुसरी घटना घडली आहे. यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. गुन्हेगारीला आळा घालावा, अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे.

Web Title: marathi news amlaner petrol pump hatya police