अमळनेरमध्ये मध्यरात्री गोळीबारात पेट्रोलपंपचालकाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

जळगाव : अमळनेर शहरातील सर्वांत जुन्या आणि प्रसिद्ध पेट्रोलपंपाचे मालक बाबा बोहरी यांच्यावर आज मध्यरात्रीनंतर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांशी दीड वाजता संपर्क केला असता त्यांच्याकडे पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आले. 

भागवत रोडवरील शिवाजी उद्यानाजवळील पेट्रोलपंप मालक बाबा बोहरी यांनी नियमितपणे रात्री बाराला पेट्रोलपंप बंद केला. ते दुचाकीने शिवाजी उद्यानाकडून घरी जात होते. रस्त्यावर दोन ते तीन जण धबा धरून बसले होते. त्यापैकी एकाने बाबा बोहरी यांच्या छातीवर गोळी झाडली. त्यामुळे ते दुचाकीवरून खाली पडले. नंतर दुचाकी सोडून जीव वाचविण्यासाठी ते आपल्या पेट्रोलपंपाकडे पळत सुटले. पेट्रोलपंपावर पोचल्यानंतर त्यांनी पाणी घेतले. नंतर त्यांना डॉ. निखिल बहुगुणे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये पोलिस उपअधीक्षक रफिक शेख पोचले असून, माहिती घेत होते. आमदार स्मिता वाघ, रामभाऊ संदानशिव, सलीम टोपी, लालू सैनानी यांच्यासह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

Web Title: marathi news amlaner petrol pump shoot