पहिल्याच पावसात जवखेडा पाणीदार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

अमळनेर : पाणी फाऊंडेशन अंतर्गत वॉटर कप स्पर्धेत जवखेडा (ता. अमळनेर) येथे विविध कामे झाली आहेत. काल (ता. 2) रात्री झालेल्या पावसाने श्रमतदानातून तयार करण्यात आलेले तलाव, नाले पूर्ण भरले असून, जवखेडा गाव खऱ्या अर्थाने पाणीदार झाले आहे. याबद्दल अभिनेते आमीर खान, श्रीमती किरण राव व जिल्हाधिकाऱ्यांचा ग्रामस्थांनी ऋणनिर्देश केला आहे. 

पाणी फाऊंडेशन अंतर्गत सुरू असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत तालुक्‍यातील 49 व पारोळा तालुक्‍यातील 50 गावांनी सहभाग घेतला आहे. यात सर्वाधिक जलसंधारणाची कामे जवखेडा (ता. अमळनेर) येथे करण्यात आली. शनिवारी (ता. 2) झालेल्या पावसाने जवखेडा गाव जणू काही जलखेडा बनले असून, गाव पाणीदार दिसू लागले आहे. याबद्दल अभिनेते आमीर खान, श्रीमती किरण राव, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकरांसह विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील श्रमदान करून प्रोत्साहन देणाऱ्या मान्यवरांचा ग्रामस्थांनी ऋणनिर्देश केला आहे. 
जवखेडा येथे 45 दिवसाच्या या स्पर्धेत 22 मेपर्यंत श्रमदान करण्यात आले. या दरम्यान गावात जलसंधारणाबरोबरच मनसंधारण झाल्याने खऱ्या अर्थाने एकजुटीनं पेटलं रान अशी स्थिती दिसून येत आहे. श्रमदानातून तयार केलेले व यंत्राच्या साह्याने तयार करण्यात आलेल्या शेततळ्यांमध्ये पहिल्याच पावसात मोठे पाणी साचले आहे. नाला खोलीकरणांतर्गत विविध नाल्यांचे खोलीकरण झाल्याने त्यातही पाणी साचले आहे.

Web Title: marathi news amlaner water cup