संत सखाराम महाराजांची पायी वारी निघाली पंढरपूरकडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

अमळनेर : संत सखाराम महाराजांच्या जयघोषात प्रसाद महाराज आज दुपारी बाराच्या सुमारास पंढरपूरच्या पायी वारीसाठी निघाले. पैलाड भागातील तुळशी बागेतून ही पायी वारी निघाली. 22 दिवस मुक्काम करीत ही दिंडी पंढरपूरला पोहचेल. 

गेल्या 31 वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. अमळनेरहून सुमारे तीनशे भक्त वारीसाठी निघाले आहेत. पंढरपूरपर्यंत दोन हजार वारकरी वारीत सहभागी होतील. प्रसाद महाराज यांनी पांढरा शुभ्र वस्त्र परिधान करून डोक्‍यावर घोंगडी घालत आज दुपारी बाराच्या सुमारास पैलाड येथील तुळशी बागेतून प्रस्थान केले. त्यांचा पहिला मुक्काम पारोळा येथे असून त्याठिकाणाहून वारकरी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी होतात. 

Web Title: marathi news amlner dindi payi vari

टॅग्स