गिरीश महाजनांचे पोस्टर जाळून निषेध 

live photo
live photo

अमळनेर : अर्थसंकल्पात पाडळसरे धरणासाठी केवळ 32 कोटी 50 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. धरण गेल्या 25 वर्षापासून राजकीय अनास्थेने रेंगाळले आहे. या पार्श्‍वभुमीवर आज सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे पोस्टर जाळून शासनाचा निषेध करण्यात आला. 

अमळनेर तालुक्‍यातील पाडळसरे धरणाचे काम अपुर्ण स्थितीत असताना अर्थसंकल्पात केवळ 32 कोटी 50 लाख रूपयांची तरतुद करण्यात आली आहे. याचा निषेध करत राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आज आंदोलन करत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे पोस्टर जाळून निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, बाळू पाटील, योजना पाटील, संदीप पुनाजी पाटील आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी यावेळी 'फसणवीस सरकारचा धिक्कार असो', गिरीश महाजन यांच्या विरोधातही घोषणाबाजी करुन निषेध केला. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी धरण जनआंदोलन समितीच्या उपोषणास सहभागी झालेत. पाडळसरे धरणासाठी विद्यमान आमदारांचे अपयश असल्याचा भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्‍त केल्या. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com