चिखली नदी बुडून नगावच्या शेतकऱ्याचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

अमळनेर : नगाव बुद्रुक (ता. अमळनेर) येथील एका शेतकऱ्याचा चिखली नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असता वैद्यकीय अधिकारी तब्बल चार तास उशिरा आले. मृताच्या नातेवाइकांनी मृतदेह घेण्यास नकार दिला. एका पंचायत समिती सदस्यासह ग्रामस्थांनी नाराजी व्यक्‍त करत रुग्णालयातच ठिया आंदोलन केले. 

नगाव बुद्रुक (ता. अमळनेर) येथील शेतकरी शांताराम गिरधर जाधव (वय 55) हे जनावरे चारण्यासाठी कुऱ्हे खुर्द शिवारात गेले होते. चिखली नदीत पाणी असल्याने जनावरे हाकताना पाय घसरून ते पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. त्यांच्यासोबत असलेल्या गुराख्याच्या ही घटना लक्षात आल्यावर त्यांनी मदतीसाठी ग्रामस्थांना बोलावले. पंचायत समिती सदस्य विनोद जाधव यांना ही बाब समजल्यानंतर ते घटनास्थळी पोचले. दीडच्या सुमारास त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. विच्छेदनासाठी मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. अडीचपर्यंत पंचनामा झाला. मात्र, त्यानंतर विच्छेदन करण्यासाठी सुमारे चार तास होऊनही वैद्यकीय अधिकारी डॉ. व्यवहारे न आल्याने पंचायत समिती सदस्य विनोद जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी मृतदेह घेण्यास नकार देवून ठिया आंदोलन केले. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचे ठिया आंदोलन सुरूच होते. शांताराम पाटील यांच्या मागे तीन मुले, पाच मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. श्री. जाधव यांनी ग्रामीण रुग्णालयातील असुविधांबाबत नाराजी व्यक्‍त केली. वेळेवर रुग्णांना उपचार होत नसतील तर ग्रामीण काय कामाचे ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

Web Title: marathi news amlner river former death