महाआघाडीच्या समीर भुजबळांसाठी  डॉ.कोल्हे यांची मोटरसायकल रॅली 

live
live

नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला निराश केले आहे. सध्या देशात केवळ महाआघाडीचे वादळ असल्याचे मत अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्‍त केले. नाशिक मतदार संघातील महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ आयोजित मोटारसायकल रॅलीनंतर त्यांनी आडगाव नाका परीसरात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. 
   

सिडकोतील लेखानगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मोटारसायकल रॅलीची सुरवात झाली. यानंतर ही रॅली शिवाजी चौक, महाराणाप्रताप चौक, विजय नगर, उत्तमनगर, पवन नगर, सावतानगर, दिव्या ऍडलॅब, त्रिमूर्ती चौक, सिटीसेंटर चौक, सिबल हॉटेल, श्रद्धा मॉल, कॅनडा कॉर्नर, शरणपुर रोड, सीबीएस, शालीमार, गाडगे महाराज पुतळा, धुमाळ पॉईट, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा मार्गे जुना आडगाव नाका येथे प्रचार रॅलीचा समारोप केला. 

मोटारसायकल रॅलीत उमेदवार समीर भुजबळ, डॉ.अपुर्व हिरे, कोंडाजीमामा आव्हाड, शरद आहेर, गजानन शेलार, डॉ. हेमलता पाटील, गुरमीत बग्गा, लक्ष्मण जायभावे, आण्णा पाटील, नरेश पाटील, रवी हिरवे, समाधान जाधव, रंजन ठाकरे,डॉ. शेफाली भुजबळ, शोभा मगर, सुरेखा निमसे आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस मित्रपक्षांच्या महाघाडीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com