भारतीय रिझर्व्ह बँकेच्या शिष्टमंडळात अमृता पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

नाशिक : येथील गोदावरी अर्बन बँकेचे अध्यक्षा आर्किटेकट अमृता पवार यांची युरोपातील सहकारी बँकिंगसह कृषी व औद्योगिक प्रगतीचा अभ्यास करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या शिष्टमंडळात निवड झाली. 20 सदस्यांचे शिष्टमंडळ जर्मनी व नेदरलँडच्या दौऱ्यावर रवाना झाले.
 

नाशिक : येथील गोदावरी अर्बन बँकेचे अध्यक्षा आर्किटेकट अमृता पवार यांची युरोपातील सहकारी बँकिंगसह कृषी व औद्योगिक प्रगतीचा अभ्यास करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या शिष्टमंडळात निवड झाली. 20 सदस्यांचे शिष्टमंडळ जर्मनी व नेदरलँडच्या दौऱ्यावर रवाना झाले.
 

जर्मनी व नेदरलँडमधील विविध शहरांना हे शिष्टमंडळ 8 ते 14 जुलैला भेट देईल. शिष्टमंडळात महाराष्ट्रातील निवडक नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष व संचालकांचा देखील समावेश आहे.    महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये सहकारी बँकिंगच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रावर सहकाराचा प्रभाव जाणवतो.. सहकारी संस्थांच्या माध्यमातून परस्पर सहकार्याने समाजातील विविध घटक एकत्र येऊन परस्परांच्या गरजांची पूर्तता करतात . अश्या बहुआयामी सहकार चळवळीमध्ये नागरी सहकारी बँकांचा वाटा उल्लेखनीय आहे. त्याची दखल घेऊन  रिझर्व्ह बँकेने निवडक बँकांचे अध्यक्ष व संचालकांना युरोपमधील अभ्यास दौऱ्यावर पाठवले आहे.
 

अभ्यास दौऱ्यामध्ये मोंटेबोर, फ्रांकफुर्ट, एम्सटरडम आदी शहरांना भेटी देणार आहेत. तेथील डी. झेड. बँक, युरोपियन सेन्ट्रल बँक, स्थानिक सहकारी बँका, व कृषी क्षेत्रातील वित्तिय संस्थांच्या कार्याचे अवलोकन ते करणार आहेत. या भेटीदरम्यान सहकारी बँकांचे व्यवस्थापन, सहकारी बँकिंग समोरील आव्हाने, सामाजिक बँकिंग, शेतीला अर्थसहाय्य अश्या वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास  शिष्टमंडळ करणार आहे.
 अभ्यास व्यवहारात आणणार

युरोपियन युनियनच्या माध्यमातून युरो हे चलन स्वीकारून युरोप खंडातील देश परस्पर सहकार्याच्या माध्यमातून सर्वच आघाड्यांवर सामुदायिक विकास सध्या करत आहेत. एकूणच परस्पर सहकार्य व समन्वयातून विकासाचे सूत्र युरोपात चांगले विकसित झाले आहे, असे सांगून अमृता पवार म्हणाल्या, की औद्योगिक प्रगतीबरोबर युरोपात बँकिंग व शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग होतात. त्याचा अभ्यास करून बँकिंग व्यवहारात उपयोग केला जाईल./

Web Title: marathi news amruta pawer select