संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेची निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

नाशिकः शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यासह उत्पादन खर्चावर आधारीत दिड पट हमीभाव द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. 

नाशिकः शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यासह उत्पादन खर्चावर आधारीत दिड पट हमीभाव द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. 

   शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत किमान दीडपट किफायतशीर हमीभाव मिळण्याचा आधिकार मिळावा ही अखिल भारतीय किसान संर्घष समितीतील सहभागी देशातील 193 शेतकरी संघटनाची मागणी आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी लोकसभेत,खासदार के.के.रागेश हे राज्यसभेत त्यासाठीचे ठराव मांडणार आहेत. त्यासाठी देशभर फिरुन जागोजागी मेळावे घेउन पुढे आलेल्या या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत लोकसभा व राज्य सभेच्या सभापतीना पत्र देउन मागणी केली जाणार आहे. 

देशात गेल्या दहा बारा वर्षात मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांना आत्महत्येतून बाहेर काढण्यासाठी संपूर्ण कर्जमुक्ती हाच सक्षम पर्याय आहे. कृषी व्यवस्थेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शासनाने संपूर्ण कर्जमुक्ती करावी अशी मागणी करीत,लोकसभा व राज्य सभेच्या अध्यक्षांकडे मागणी करणारे पत्र संघटनेतर्फे देण्यात आले. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, सुधाकर मोगल, नाना बच्छाव, साहेबराव मोरे आदीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. 

Web Title: marathi news andolan