Maratha Kranti Morcha : नाशिकमध्ये ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण,कोकाटेंना धक्काबुक्की,गाडीच्या काचा फोडल्या 

live
live

नाशिकः मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ पुकारलेल्या ठिय्या आंदोलनाला नाशिकमध्ये हिंसक वळण लागले. आंदोलनादरम्यान दोन गटात झालेल्या बाचाबाचीनंतर मारहाणीचा प्रकार घडला. त्याचवेळी आंदोलनाच्या ठिकाणी असलेल्या महागड्या गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर समुहाने शहर परिसरात फिरून दुकाने हॉटेल्स बंद करण्यासाठी आवाहन केले.

पाचशे हजारांच्या पुढे असणाऱ्या या समुहाने शहरातील चौकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. एक मराठा,लाख मराठा,छत्रपती शिवाजी महाराज की जय,आरक्षण मिळालेच पाहिजे या सारख्या घोषणानी शहरातील परिसर दुमदुमून गेला होता. केशव पाटील,अरूण पोरजे आणि दीपक बच्छाव यांच्या गाडीच्या काचा फोडल्या,पोलिसांनी वेगवेगळ्या चौकात हा समुह रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यांला समुहाने प्रतिसाद न देता पुढे पुढे जातच राहिले. मुंबई-आग्रा महामार्गावर बस पेटवत दहशत पसरविण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी काही कार्यकर्तायंनी ताब्यात घेतले आहे.... 

नाशिकमधील दुपारपर्यतचे अपडेट 
-नाशिक जिल्ह्यात नैताळे,वडनेर खाकुर्डी,पाचोरेवणी,चांदवड,मनमाड,सटाणा, ठेंगोंडा येथे रास्ता रोको 
-शहरात माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना जमावाकडून धक्काबुक्की
-ठिय्या आंदोलनादरम्यान गोंधळ,आंदोलनाला गालबोट 
-पोलिसांचा समजावण्याचा प्रयत्न,शांततेचे आवाहन,काही कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात 
-आंदोलनामध्ये बाचाबाची,जोरदार घोषणाबाजी 
-एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी,छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा 
-केशव पाटील,अरूण पोरजे,दीपक चव्हाण यांच्या गाड्या फोडल्या 
-जिल्ह्यातील सर्व एसटी स्थानकातच उभ्या,खाजगी वाहतूकीवर परिणाम 
-दहशत पसरविण्याचा प्रयत्न,जिल्ह्यात जाळपोळ, पोलिसांकडून अटकाव करण्याचा प्रयत्न 
-मराठा क्रांती समाजचे कार्यकर्ते समुहाने रस्त्यावर, शहर परिसरात फिरून दुकाने,हॉटेल बंदच 
-साकोरा- येथे बैलगाड्या लावून रस्ता अडवला, 
-नांदगाव-जेलभरो कार्यकर्त्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद 
-सायखेडा परिसतात बाजार समिती आवारात शुकशुकाट 
- सटाणा-विंचूर प्रकाशा राज्य महामार्ग ठप्प 
-नाशिक-मुंबई- आग्रा,औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको, वाहतूक ठप्प 
-कळवण- मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ युवकांची शहरात रॅली 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com