मूक आंदोलनातून राष्ट्रवादी'तर्फे सरकारचा निषेध 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

नाशिकः महिलांवरील अत्याचार व सुरक्षेच्या प्रश्नाच्या अनुषंगाने महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आज गुरुवारी (ता. 8) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक आंदोलन करत सरकारचा निषेध केला. 

नाशिकः महिलांवरील अत्याचार व सुरक्षेच्या प्रश्नाच्या अनुषंगाने महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आज गुरुवारी (ता. 8) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक आंदोलन करत सरकारचा निषेध केला. 

शहर व जिल्ह्यात सगळीकडे विविध कार्यक्रमांनी महिला दिन साजरा होत असतांना,राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी तोंडाला काळ्या फिती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी अकराला हातात हिंसा नही सम्मान चाहिये, जीवन का आधार चाहिये. लगातार बलात्कार, फडणवीस सरकार गुनहगार...हमे चाहिये सुरक्षा या आणि अशा फलकाद्वारे सरकारचा निषेध करीत राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले.समाजात महिलांवरील अत्याचार, हुंडाबळी, मानसिक, शारीरिक छळ, भेदभाव आदींच्या माध्यमातून स्त्रीयांवरील अन्यायाविरोधात आंदोलन करण्यात आले. 

केवळ सासर हेच महिलांवरील अत्याचाराचे केंद्र नाही, तर मुलीच्या जन्मापासूनच ती नको म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं.सामाजिक स्तरावर या अत्याचाराला वाचा फोडणे गरजेचे आहे याच्या विरोधात मूक आंदोलन करून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आल्याचे सौ बलकवडे यांनी सांगितले. पुष्पलता उदावंत, नीलिमा काळे, सायरा शेख, मेघा दराडे, पूनम गवळी, पूनम बर्वे, वंदना भामरे, अपर्णा देशमुख, मगंल भालेराव, सायरा शेख, नुरज हा मन्सुरी,नंदा वाघमारे, राणी काळशेकर आदीं महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. 
 

Web Title: marathi news andolan ncp