लोकसहभागातून  आदिवासी भागातील अंगणवाड्या बनल्या डिजिटल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

नाशिक: बॉश कंपनीचे सामाजिक दायित्व आणि लोकसहभागामुळे त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील अंगणवाड्या डिजिटल बनल्या आहे. लोकसहभाग आणि कंपनीने केलेली मदत ही आदिवासी भागासाठी वरदान ठरणार आहे. 

त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील अतिदुर्गम भागात असलेल्या भिलमाळ, अस्वलीहर्ष, झारवड खुर्द, सामुंडी एक आणि दोन, आळवंड आदी अंगणवाड्यांचे बॉश कंपनीने सीएसआर फंडातून केलेली मदत आणि लोकसहभागामुळे ही केंद्रे डिजिटल बनली आहे. 

झारवड येथे ग्रामपंचायतीच्या निधीतून झारवड येथील अंगणवाडी केंद्रामुळे मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकीन व्हेडिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आले. त्याचे उद्‌घाटन महिला व बालकल्याण समिती सभापती अपर्णा खोसकर यांच्या हस्ते करण्यात आले. 
ज्याप्रमाणे अंगडवाड्या ह्या डिजिटल झाल्याने बोलक्‍या झाल्या त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी देखील बोलके व्हावे असे सल्ला विद्यार्त्थांना सभापती खोसकर यांनी देत कुपोषणमुक्त अंगणवाडी करण्याचा निर्धार अंगणवाडी सेविका अणि पर्यवेक्षिका यांनी करावा असे आवाहन देखील यावेळी केले. याप्रसंगी जि.प. सदस्या शालिनी डगळे, गावांचे सरपंच, सरपंच, बालविकास अधिकारी अमोल डिगोळे, सागर वाघ, पर्यवेक्षिका आदी उपस्थित होत्या. 

Web Title: marathi news anganwadi school