जिल्ह्यातील पशुगणनेला उजाडणार नववर्ष 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

नाशिक: पशुगणनेसाठी टॅबचा वेळवर न झालेल्या पुरवठामुळे तब्बल एक ते दीड वर्ष उशिराने संपूर्ण जिल्ह्यात सुरू झालेली पशुगणना जिल्ह्यात डिसेंबर 2018 अखेरपर्यंत पूर्ण होणे अशक्‍य आहे. जिल्ह्यात किती जनावरांची निश्‍चित संख्या मिळण्यासाठी नववर्ष उजाडणार आहे. यंदा प्रथमच तंत्रज्ञानाच्या मदत घेत ऑनलाईन पद्धतीने पशुगणना करण्यात येणार आहे. मात्र दुर्गम भाग, वाड्या, गावांमधील अंतर, इंटरनेटची स्थिती यामुळे ही जनगणना वेळेत होणे अशक्‍य आहे. 

पशुसंवर्धन विभागातर्फे दर पाच वर्षांनी जिल्ह्यातील पशुंची गणना केली जाते.2012 साली अखेरची पशुगणना करण्यात आली होती. 2017 मध्ये ही पशुगणना होणे अपेक्षित होते. पण यावेळी तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने थेट पशुपालकांच्या घरी जाऊन पशुंची ऑनलाईन नोंदी करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता. यासाठी टॅबही शासनाकडून प्रगणकांनी उपलब्ध करून देण्यात येणार होते. जिल्ह्यात प्रशासनाकडून सुमारे 3 हजार प्रगणकांची नियुक्ती देखील करण्यात येवून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. 2017 मध्ये टॅब खरेदीच्या प्रक्रियेला विलंब झाल्याने ही पशुगणना तब्बल एक ते दीड वर्ष रेंगाळली होती. ऑक्‍टोंबर अखेर पशुगणेनेसाठी टॅबचा पुरवठा झाल्यानंतर एक नोव्हेंबर पासून ही पशुगणनेस सुरूवात करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील दुर्गम भाग, आदिवासी पाडे, गावांमधील अंतर, ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी कनेक्‍टीव्हीची अडचण, पशुपालकांकडील गणनेच्यावेळी पशुंची उपलब्धता यामुळे अडचण येत आहे. 

Web Title: marathi news animal counting