अंजलीला बोन मॅरो ट्रान्सप्लान्टने जीवनदान., "मानवता'च्या डॉक्टरांचे यश 

live
live

नाशिकः नंदूरबारच्या दुर्गम भागातील अंजली रहासे (वय 14 वर्षे) या मुलीला नाशिकच्या एच. सी. जी. मानवता कॅन्सर सेंटरमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लान्टद्वारे जीवनदान मिळाले. मेंदूतील रक्तस्त्रावर सेंटरच्या तज्ज्ञांनी मिळवलेले नियंत्रण तिला वरदान ठरले. 

    एकेदिवशी दैनंदिन काम करतांना अंजलीला थकवा जाणवू लागला. मग तिच्या आईला काळजी वाटू लागली आणि तिला एका स्थानिक डॉक्‍टरांकडे नेले. डॉक्‍टरांच्या तपासणीत तिचे रक्ताचे प्रमाण कमी असल्याचे निष्पन्न झाले. हातावरचे पोट असलेल्या चिंताग्रस्त पालकांनी नंदूरबार शहराकडे धाव घेतली. तिथं केलेल्या रक्त तपासणी लाल व पांढऱ्या रक्तपेशी, प्लेटलेट्‌स कमी असल्याचे निदर्शनात आले. त्यामुळे डॉक्‍टरांनी तिला रक्त देण्याचे अथवा "ब्लड ट्रानफ्युशन'चा सल्ला दिला. 

अशक्तपणा आलेली अंजली अंथरुणाला खिळली होती. तिची खालावत चालेली प्रकृती पाहून पालकांनी नाशिकमध्ये राहणाऱ्या मामांशी संपर्क साधला आणि तिला नाशिकला आणले. सर्व कुटुंब एच. सी. जी. मानवता कॅन्सर सेंटरमध्ये तिला घेऊन दाखल झाले. सेंटरमधील रक्त विकारांचे तज्ज्ञ डॉ. निलेश वासेकर आणि डॉ. गिरीश बदरखे यांनी तपासणी  केल्यानंतर तिला अप्लास्टिक अनेमिया (रक्ताचा आजार) असल्याचे निदान केले. तिला व तिच्या पालकांना रोगाविषयी आणि उपचारांची माहिती दिली. "अप्लास्टिक अनेमिया' या आजारामुळे अंजलीच्या शरीरामध्ये रक्त तयार होण्याची प्रक्रिया थांबलेली होती. त्यावर उपाय म्हणून तिला सुदृढ दात्याकडून अस्थी मज्जा प्रत्यारोपणाची (बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट) तातडीने आवश्‍यकता होती. हे सर्व ऐकून संपूर्ण कुटुंब खचून गेले. 

मामाची खंबीर साथ 
मामा अंजलीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिले आणि "बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट' करण्याचा निर्णय घेतला. अंजलीची बहीण तिच्यासाठी "बोन मॅरो डोनर' ठरली. पण हा आनंद फार थोडा काळ टिकला. शेतमजुरी करणाऱ्या अंजलीच्या वडीलांकडे उपचारासाठीची आवश्‍यक रक्कम आवाक्‍याच्या बाहेर होती. सेंटरच्या सामाजिक कार्य पथक आणि मामांच्या प्रयत्नांतून पंतप्रधान निधीतून मदत आली.  ही रक्कम "बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट'साठी अपुरी होती. अशा परिस्थितीत सेंटरच्या "टीम'ने तिला लागणाऱ्या महागड्या औषधांची आणि तपासण्यांची जबाबदारी उचलली. हे सर्व सुरु असताना अंजलीला मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला. यावेळी खचून न जाता डॉक्‍टरांनी प्रयत्न सुरु ठेवले. तिची शारीरिक परिस्थिती सुधारताच, "बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट' ची प्रक्रिया सुरु केली. त्यात डॉक्‍टरांनी यश मिळवले. 

""आंतराष्ट्रीय दर्जाची उपचार पद्धती, अद्यावत सुविधा अन्‌ साऱ्यांचे प्रयत्न अंजलीला बरे करण्यात यशस्वी ठरलेत. अंजलीच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरील समाधान अवर्णनीय होते.'' 
- डॉ. गिरीश बदरखे 
 

""उत्तर महाराष्ट्रातील "अप्लास्टिक अनेमिया' व रक्ताचे इतर आजारचे वाढते प्रमाण लक्षात घेता "बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट' हे या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. हा दुर्धर आजार "बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट' मुळे 80 टक्के रुग्ण बरा होऊ शकतो. 
-डॉ. निलेश वासेकर 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com