जिल्ह्यात २१२ जण निवडणूक रिंगणात,३१ जणांचे अर्ज बाद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

नाशिक ः विधानसभा निवडणूकीत शनिवारी (ता. 5) अर्ज छाननीत जिल्हाभरातील 15 विधानसभा मतदार संघात 243 पैकी 31 उमदेवारी अर्ज बाद झाल्याने आज शनिवारी (ता.5) छाननी अखेर जिल्ह्यात 212 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. 

नाशिक ः विधानसभा निवडणूकीत शनिवारी (ता. 5) अर्ज छाननीत जिल्हाभरातील 15 विधानसभा मतदार संघात 243 पैकी 31 उमदेवारी अर्ज बाद झाल्याने आज शनिवारी (ता.5) छाननी अखेर जिल्ह्यात 212 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी अकराला चार ठिकाणी तर जिल्हाभरात 11 ठिकाणी एकाचवेळी अर्ज छाननीची प्रक्रिया सुरु झाली. नाशिक शहरातील तीन व इगतपुरी-त्र्यंबकेश्वर अशा चार मतदारसंघातील 6 उमेदवारांचे अर्ज बाद झाले. नाशिक मध्य व इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर मध्ये प्रत्येकी दोन तर पुर्व आणि पश्‍चिम मतदार संघातून प्रत्येकी 1 अर्ज बाद झाला. देवळाली मतदार संघात एकही अर्ज बाद झाला नाही. मध्य मतदारसंघात मनसेचे अधिकृत उमेदवार नितीन भोसले यांचा अर्ज वैध ठरल्याने त्यांच्या पत्त्नी गिता यांचा अर्ज बाद झाला. अपक्ष भगवान कांबळे यांच्या अर्जावर 1 एकच सुचक असल्याने अर्ज अवैध ठरला. त्यामुळे मतदारसंघात आत्ता 10 उमेदवार अर्ज शिल्लक आहेत. 

पश्‍चिम मतदारसंघात 30 उमेदवारांनी 48 अर्ज दाखल केले होते. छाननीवेळी भाकपाचे डी. एल. कराड यांचा अर्ज वैध ठरल्याने दुसरे उमेदवार तानाजी जायभावे यांचा अर्ज बाद झाला. योगिता हिरे, दिलीप भामरे, मंगेश पवार, दत्ता अंभोरे, महेश हिरे, विलास शिंदे, बळीराम ठाकरे, मनिषा साळुंके व प्रशांत खरात यांच्या अर्जासोबत पक्षाचा 
अधिकृत एबी फॉर्म नसल्याने त्यांचे पक्षीय उमेदवारीचे अर्ज बाद झाले तर, त्यांचे अपक्ष अर्ज मात्र कायम राहिले आहेत. त्यामुळे पश्‍चिम मतदार संघात 29 उमेदवार रिंगणात कायम आहेत 

इगतपुरीत 2 बाद 
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून 14 पैकी 2 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. अपक्ष उमेदवार अशोक झोले यांचा अर्ज अपूर्ण असल्याने तो बाद झाला. तर भारतीय ट्रायबल पार्टीकडून पोपट दामू वाघ हे पर्यायी उमेदवार असल्याने त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तेजस चव्हाण यांनी सांगितले. 
नाशिक विधानसभा निवडणूकीसाठी आज उमेदवारी अर्ज छानणीत माघारीच्या दिवशी पूर्व व पश्‍चिम मतदार संघात प्रत्येकी एक याप्रमाणे दोन अर्ज बाद झाले. 

पूवर्त 14 अर्ज 
पूर्व मतदार संघात निवडणूक निर्णय आधिकारी अरविंद अंतुलीर्कर यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी उमेदवारी अर्जाची छाननीची प्रक्रिया सुरु झाली त्यात, डॉ.राजेंद्र धनवटे या अपक्ष उमेदवारांनी त्यांच्या उमेदवारी साठी अनामत रक्कम भरली नव्हती. तसेच उमेदवारीसाठीचे प्रतिज्ञापत्र भरले नाही.तसेच शपथही घेतली नसल्याने त्यांचा 
उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला.त्यामुळे पूवर्‌ मतदार संघात 15 उमेदवारी अर्ज राहिले आहे. 

देवळाली जैसे थे 
देवळाली मतदार संघात आज एकही अर्ज बाद झाला नाही. निवडणूक निर्णय आधिकारी निलेश श्रिंगी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अर्ज छाननीची बैठक होउन त्यात, शून्य 
उमेदवारांच्या अर्जाची छाननी झाली. मात्र त्यात एकही अर्ज बाद झाला नाही. 

छाननीनंतरची स्थिती 
मतदार संघ बाद अर्ज शिल्लक 
नांदगाव 01 28 
मालेगाव मध्य 05 14 
मालेगाव बाह्य 02 11 
बागलाण 04 15 
कळवण 02 08 
चांदवड 01 14 
येवला 02 14 
सिन्नर 04 10 
निफाड 03 09 
दिंडोरी 01 08 
पूर्व 01 14 
मध्य 02 10 
पश्‍चिम 01 29 
देवळाली 00 16 
इगतपुरी 02 12 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news application cansel