सहाय्यक अभियंता पाटील यांचा तपास लागेना,अधिकारी कर्मचारी आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

नाशिक : महापालिकेच्या अति कामामुळे जीवण संपवतं असल्याची चिठ्ठी लिहून गेल्या शनिवार पासून बेपत्ता असलेले नगररचना विभागाचे सहाय्यक अभियंता रवी पाटील यांचा अजूनही शोध लागतं नसल्याने त्याचे तीव्र पडसाद पालिका वर्तुळात उमटतं असून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काम करण्याच्या पध्दतीमुळेचं अधिकारी व कर्मचारी प्रचंड तणावाखाली असल्याचा आरोप करतं आयुक्त मुंढे यांच्या विरोधात बंड पुकारण्याची तयारी कर्मचायांनी सुरु केली आहे. 

   गेल्या आठवड्यातचं आयुक्तांच्या कामकाजाच्या पध्दतीला विरोध करण्यासाठी अधिकारी वर्ग एकवटले होते. आयुक्तांना विरोध करण्यासाठी सामुहिक राजीनामे देण्याची तयारी देखील केली होती त्यातचं शनिवारी अभियंता पाटील यांनी टोकाचे पाऊल उचलले.आयुक्त पदावर रुजू झाल्यानंतर मुंढे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पदाची सुत्रे हाती घेताचं बारा जण बडतर्थ केले तर चौदा जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने अधिकारी व कर्मचारी धास्तावले आहेत.

नव्वद दिवस पुर्ण झाल्याने कामकाजात सुधारणा करा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा सज्जड दम देखील मुंढे यांनी दिला होता. त्यामुळे कर्मचारी व अधिकारी धास्तावले आहेत. महापालिकेने विकसित केलेले एनएमसी ई-कनेक्‍ट ऍप्लिकेशन व वॉक विथ कमिशनर उपक्रमामध्ये तक्रारींचे निराकरण करताना होणारी दमछाक व आयुक्तांकडून शिस्तभंगाची कारवाई होत आहे. त्यामुळे कर्मचारी व अधिकारी वर्गात प्रचंड नाराजी आहे.

   अभियंता रवी पाटील यांच्या बेपत्ता होण्यामागे हेच कारण असल्याचा आरोप करतं आयुक्तांविरोधात कर्मचारी संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत. त्यासाठी आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेचे अध्यक्ष प्रविण तिदमे यांनी रवी पाटील यांच्या बेपत्ता होण्यास आयुक्त मुंढे हेच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. आयुक्तांच्या कार्यपध्दतीमुळे अधिकारी व कर्मचारी प्रचंड तणावाखाली आहे. आयुक्तांच्या जाचातून सुटका करून घेण्यासाठी कर्मचारी संघटनांना एकत्र यावे लागणार असल्याचे ते म्हणाले. 

Web Title: marathi news assistant enginer ravi patil