"त्या' मुलांनी अनुभवली  ग्रह ताऱ्यांच्या दुनियेची सफर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

नाशिक : सुर्य, चंद्रासह पृथ्वी यांची रचना, आकाश गंगेचा विस्तार यासह ग्रह ताऱ्यांच्या दुनियेतील रंजक अशी माहिती घेतांना चिमुकल्यांनी अनोखी सफर अनुभवली. पिंपरी त्र्यंबक आश्रम शाळेतील सुमारे 84 विद्यार्थ्यांनी आज मोफत शोच्या माध्यमातून रोमांचकारी माहिती जाणून घेतली. 

नॅशनल स्पेस सोसायटीच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष अविनाश शिरोडे यांनी दिलेल्या देणगीतून या विद्यार्थ्यांना तारांगणमधील शो पाहण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे सहभागी 84 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 48 मुली व 36 मुलांचा सहभाग होता. इयत्ता आठवी व नववीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांनी भुगोलाच्या पुस्तकात यापूर्वी माहिती वाचली होती. परंतु आकर्षक पद्धतीने ही माहिती समजून घेतांना विद्यार्थ्यांचे चेहरे फुलले होते. शो झाल्यानंतर श्री. शिरोडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना त्यांच्या शंकांचे समाधानही केले. आपणही आंतराळ क्षेत्रात करीअर करू असा विश्‍वास यावेळी विद्यार्थ्यांनी विशेषत: मुलींनी व्यक्‍त केला. या उपक्रमानिमित्त दुर्गम पाड्यावर राहणाऱ्या या विद्यार्थ्यांना इस्त्रोसह चंद्रयान, मंगलयान यांच्यासह माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याविषयीची माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली. 
 
Web Title: marathi news astronotics