गोठी मैं कौन्सी चीज फेमस है? अटलजींचा सवाल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

घोटी : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी घोटी शहरात 1984 मध्ये जुने भाजी मार्केट येथे आपल्या अमोघ वाणीने सभा गाजविली होती. त्यांच्या निधनाने या सभेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. 

घोटी : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी घोटी शहरात 1984 मध्ये जुने भाजी मार्केट येथे आपल्या अमोघ वाणीने सभा गाजविली होती. त्यांच्या निधनाने या सभेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. 

घोटी शहरात 1984 मध्ये श्री. वाजपेयी प्रचारसभेकरिता आले होते. त्यांना ऐकण्यासाठी त्या वेळी बैलगाड्यांमधून लोक आले होते. दहा हजारांच्या आसपास लोक सभास्थानी जमले होते. घोटी शहराध्यक्ष श्‍यामलाल शर्मा, उपशहराध्यक्ष (स्व.) अशोक मुनोत, गोविंदराव कोतूळकर, (स्व.) अनंत दळवी, नरसिंग राखेचा, (स्व.) अशोक कुमट, (स्व.) जीवन शाह, सुमतिलाल शाह आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा व त्यांच्याशी चर्चा करण्याच्या आठवणी ताज्या झाल्या. शहरातील पन्नालाल अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की सभेवेळी अटलजी यांनी "गोठी मे कौन्सी चीज फेमस है' असा सवाल केला. या वेळी अग्रवाल यांनी "मुरमुरा' असे सांगितले. घोटी शहरातील तांदूळ, मुरमुरा त्यांना भेट दिल्याचे श्री. अग्रवाल यांनी सांगितले. 
.. 
 
Web Title: marathi news atal sabha in ghoti