नाशिकमध्ये आजपासून राज्य ऍथलेटिक्‍स स्पर्धा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

नाशिकः नाशिक जिल्हा ऍथलेटिक्‍स असोसिएशनतर्फे आणि महाराष्ट्र राज्य ऍथलेटिकस असोसिएशनच्या मान्यतेने उद्या (ता.24) पासून दोन दिवस विभागीय क्रीडासंकुलातील ट्रॅकवर ज्युनिअर गटाच्या वीस वर्षाआतील मुला-मुलींची राज्य ऍथलेटिक्‍स स्पर्धा होत आहे. 

या स्पर्धेत महाराष्ट्रातील मुंबई- पुणे, नागपूर, सातारा अशा विविध जिल्हातील एकूण 455 खेळाडू सहभागी होणार आहेत. यात राष्ट्रीय- ांतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविलेल्या नामवंत खेळाडूंचा सहभाग असेल. नाशिकने ऍथलेटिक्‍स या खेळाची खाण म्हणून ओळख निर्माण केली आहे.

 स्पर्धेत नाशिकच्या आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडू ताई बामणे, दुर्गा देवरे,अभिजित हिराकूड, अनंत नामदेव अशा धावपटूंसह नाशिकच्या 32 धावपटूंचा सहभाग असेल. या स्पर्धेच्या निमित्ताने उद्या(ता.24) भारतीय आणि महाराष्ट्र ऍथलेटिकस असोसिएशनचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आदिल सुमारीवाला, महाराष्ट्र राज्य ऍथलेटिकस असोसिएशनचे सचिव सतीश उच्चील, महाराष्ट्र राज्य ऍथलेटिकस असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा या राज्य स्पर्धेचे आयोजन समितीचे अध्यक्ष हेमंत पांडे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक बॅप्टीस, नाशिक ऍथलेटिकस असोसिएशनचे संचालक मेजर झरेकर, आर. जी. कुलकर्णी, चौधरी यात्रा कंपनीचे संचालक चौधरी त्याच्यासह महाराष्ट्रातले नामवंत तांत्रिक अधिकारी आणि पंच उपस्थित राहणार आहेत. 

 सहभागी होणाऱ्या खेळाडू त्यांचे प्रशिक्षक, व्यवस्थापक, तांत्रिक पदाधिकारी, पंच या सर्वांची निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी चौधरी यात्रा कंपनी, शिवानंद इलेट्रॉनिक्‍स, एल.आय. सी. नाशिक, हैप्पी होम, हर्ष कॉन्स्ट्रक्‍शन, मल्टिफ्लेक्‍स टेलिकॉम, डी कॉम, कंपनी, फ्रावशी इंटरनॅशनल स्कुल, साई स्पोर्टस आदिंनी प्रायोजकत्व दिले आहे.

  या स्पर्धेचे आयोजन चांगल्या प्रकारे होण्यासाठी नाशिक जिल्हा ऍथलेटिकस असोसिएशनचे सचिव तथा महाराष्ट्र ऍथलेटिकस असोसिएशनचे सहसचिव राजीव जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ता जाधव, वैद्यनाथ कांबळे, गंगाधर जाधव आदी परिश्रम घेत आहे. या स्पर्धेला उद्या(ता.24) सातला दहा हजार मिटर धावण्याच्या स्पर्धेने सुरवात होईल. त्यानंतर लांबउडी, उंच उडी, भाला फेक, थाळी फेक आणि गोळा फेक अशा प्रकारची स्पर्धा होईल. अशी माहिती स्पर्धेचे संयोजन सचिव राजीव जोशी यांनी दिली. 

Web Title: marathi news athletics championship