नाशिकरोड येथे एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

नाशिक : नाशिकरोड येथील उड्डाणपुलाखाली 26 वर्षीय युवकावर दोघांनी कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार घडला. सिन्नरच्या सांस्कृतिक कला केंद्रामध्ये झालेल्या वादातून संशयित तिघांनी युवकावर हल्ला केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. 
 
नवाज बाबु शेख (26 रा. सैलानी बाबा दर्गाजवळ, श्रीकृष्णनगर, अरिंगळे मळा, नाशिक) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, नवाज शेख हा सिन्नर येथील सांस्कृतिक कला केंद्र येथे गेला असता, त्याठिकाणी संशयित दत्ता भांगरे (34, रा. कुंभारगल्ली, देवळाली गाव) याच्याशी वाद झाला होता. या वादाची कुरापत काढत संशयित दत्ता भांगरे व त्याचे दोन साथीदार गजू सोमनाथ थोरात (30, रा. किसन चौक, अरिंगळे मळा, एकलहरा रोड, नाशिकरोड) , सुनील थोरात या तिघांनी शेखचा पाठलाग केला आणि त्यास नाशिकरोडच्या उड्डाणपुलाखाली भाजी मार्केटमध्ये गाठले. याठिकाणी गेल्या बुधवारी (ता.14) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास संशयित दत्ता भांगरे व सुनील थोरात यांनी त्यांच्याकडील कोयत्याने शेख याच्या मानेवर, डाव्या हातावर वार करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर संशयित पसार झाले. गंभीर जखमी शेख यास खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीसात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित दत्ता भांगरे, गजू थोरात या दोघांना अटक केली असून सुनील थोरात फरार आहे. 
 
Web Title: marathi news attack

टॅग्स