ऑटो-डीसीआर त्रुटीतील अपयशामुळे सॉफ्टटेक कंपनी काळ्या यादीत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जून 2019

नाशिक ः बांधकाम परवानग्या सुलभ होण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या ऑटो-डीसीआर प्रणालीतील त्रुटी दूर अद्यापही दूर होत नसल्याने अखेरीस 35 नोटिसांनंतर महापालिकेने संबंधित कंपनीलाच काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरू केली आहे. काळ्या यादीत टाकल्यास नाशिकसह इतर शहरांतील कंत्राट हातून जाण्याच्या भीतीने कंपनीने कारवाई टाळण्यासाठी महापालिकेच्या खेट्या मारण्यास सुरवात केली आहे. 

शहर विकास नियंत्रण नियमावलीत ऑनलाइन परवानग्या बंधनकारक करण्यात आल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने मे 2017 पासून ऑटो-डीसीआर संगणकप्रणाली अमलात आणली आहे. पुणे येथील सॉफ्टटेक इंजिनिअरिंग कंपनीमार्फत प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. पूर्वी महापालिकेत ऑफलाइन पद्धतीने काम होत होते. ऑटो-डीसीआर प्रणालीमुळे ऑफलाइन पूर्णपणे बंद झाल्याने वास्तुविशारदांना ऑटो-डीसीआर प्रणालीवरच अवलंबून राहावे लागले मात्र सॉफ्टवेअरमधील तांत्रिक दोष, पीडीएफ न मिळणे, बांधकाम परवानगी वेळेत न मिळणे, एकदा प्रस्ताव नाकारल्यानंतर पुन्हा छाननी फी अदा करणे भाग पाडणे अशा तक्रारी येत होत्या. वारंवार होणाऱ्या तक्रारींनुसार महापालिकेने कंपनीला तब्बल 35 वेळा नोटीस दिली तरीही कंपनीकडून दाद मिळत नसल्याने अखेरीस सॉफ्टेक इंजिनिअरिंग कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नगररचना विभागाला दिले आहेत

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news auto dcr process