आयुर्वेदिक औषधांमध्ये ऍलोपॅथीचे घटक, आयुर्वेदिक डॉक्‍टराची शक्कल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

नाशिक : मखमलाबाद नाक्‍यावरील आयुर्वेदिक डॉक्‍टरने रुग्णांसाठीच्या औषधांमध्ये ऍलोपॅथीचे औषधे मिसळल्याचे उघडकीस आले आहे. अन्न व औषध विभागाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात बनावट औषधे हस्तगत केली असता, त्यांच्या तपासणी अहवालानंतर औषधे बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

आयुर्वेदिक डॉक्‍टर विरेंद्र कुमारनसिंग गिरासे (रा. ऊर्जा आयुर्वेदिक क्‍लिनीक, पेठकर प्लाजा, मखमलाबाद नाका, पंचवटी) याच्याविरोधात पंचवटी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

  अन्न व औषध विभागाचे निरीक्षक जीवन जाधव यांच्या फिर्यादीनुसार, पंचवटी पोलीसात आयुर्वेदिक डॉक्‍टर विरेंद्र गिरासे याच्याविरोधात औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित विरेंद्र गिरासे याने बीएएमएस ही पदवी घेतली आहे.

गेल्या 6 फेब्रुवारी 2018 रोजी ÷न व औषध विभागाच्या पथकाने संशयित गिरासे याच्या ऊर्जा आयुर्वेदिक क्‍लिनीकवर छापा टाकला होता. त्यावेळी पथकाने क्‍लिनीकमधील औषधे जप्त करीत ते तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविली होती. या औषधांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यातून सदरची आयुर्वेदिक औषधांमध्ये ऍलोपॅथीची औषधे मिसळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

 औषधे बनविण्याचा कोणताही परवाना नसताना, संशयित गिरासे याने बनावट औषधे तयार करून ती रुग्णांना विकल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार संशयित गिरासे याच्याविरोधात पंचवटी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक योगेश उबाळे हे पुढील तपास करीत आहेत. 
 
Web Title: MARATHI NEWS AUYURVEDIC DOCTOR