ऑनलाईन चोरट्यांनी माजी मंत्री घोलपांना घातला गंडा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 मार्च 2018

नाशिक : व्हीआयपी मोबाईल क्रमांक आणि आयफोन एक्‍स मोबाईल देण्याचे आमिष दाखवून अज्ञात संशयितांनी माजी मंत्री बबनराव घोलप यांना 1 लाख 33 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीसात अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, माजी मंत्री घोलप यांनी तीन महिन्यांपासून सायबर पोलीस ठाण्याकडे यासंदर्भात तक्रार केली असून अद्यापपर्यंत संशयितांचा शोध घेण्यात सायबर पोलिसांना यश आलेले नाही 

माजी मंत्री बबनराव घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गेल्या जानेवारी ते 20 नोव्हेंबर या दरम्यान भारती एअरटेल एंटरप्राइजेस्‌ कंपनीतून बोलत असल्याचे भासवून अज्ञात संशयितांनी माजी मंत्री घोलप यांना 7400270655, 8097107089, 9022974444 व अन्य मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधला होता. संशयितांनी त्यांच्याशी बोलताना, कंपनीकडून तुम्हाला व्हीआयपी मोबाईल क्रमांक दिला जात असून, या क्रमांकांसह एक आयफोन-एक्‍स नवीन मोबाईल देण्यात येणार असल्याचेही आमिष दाखविले. त्यानंतरही सातत्याने त्यासाठी संपर्क साधून संशयितांनी माजी मंत्री घोलप यांचा विश्‍वास संपादन केला आणि ऍपल कंपनीचा नवीन आयफोन एक्‍स मोबाईल व्हिआयपी क्रमांकासह देण्याचे त्यांना पटवून दिले. त्यानंतर संशयितांनी वेळोवेळी माजी मंत्री घोलप यांना बॅंक खात्यावर पैसे भरण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनीही 1 लाख 33 हजार 120 रुपये संशयितांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या बॅंक खात्यावर भरले. परंतु त्यानंतरही ऍपलचा आयफोन-एक्‍स व व्हीआयपी क्रमांक मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात सायबर पोलीस ठाण्याकडे तक्राकर केली होती. मात्र गेल्या तीन महिन्यात संशयितांपर्यंत पोहोचण्यात सायबर पोलीसांना अपयश आल्याने अखेर, नाशिकरोड पोलिसात ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: MARATHI NEWS BABAN GHOLAP CHETING