बागलाण तालुक्यातील १७१ गावांचा भार २५ तलाठ्यावर

रोशन भामरे
गुरुवार, 18 जुलै 2019

तळवाडे दिगर- पिक विमा भरण्यासाठी ऑनलाईन सात बारा मिळविण्यासाठी बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तालुक्यातील १७१ गावांचा भार २५ तलाठ्यावर पडत असून किकवारी येथील सजा कार्यालातील तलाठ्यास तळवाडे दिगर,किकवारी खुर्द,किकवारी बुद्रुक,भिलदर,जोरण,विंचूरे,निकवेल,देवपूर,कपालेश्वर या नऊ गावांसह दोन पाडे असे आकरा गावातील शेतकऱ्यांना भार असून तलाठी कार्यालयात दिवस दिवस रांगेत शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

      किकवारी खुर्द येथील सजा कार्यालयात चार गावाचे कामकाज पाहिले जाते.मात्र, जोरण येथील सजा कार्यालयातील पाच गावांचा अधिक भार दिला गेल्याने या सर्व  गावातील शेतकऱ्यांना एकाच कार्यालयात यावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणत शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.

 शेतकऱ्यांना सात बारा सुलभ पद्धतीने मिळावा यासाठी शासनाने सर्व उतारे हे ऑनलाइन केले असताना सर्वर डाऊनच्या नावाखाली तर कधी बैठकी च्यानावाखाली ग्रामीण भागातील तलाठी कर्मचाऱ्याना तहसीलदार कार्यालयात जावे लागते त्यामुळे एखाद्या महत्वाच्या कामाला सुद्धा शेतकऱ्यांना दोन ते चार दिवस लागत असतात.

      तालुक्यातील शेतकऱ्यांनी गेल्यावर्षी पिक विमा भरण्याकडे पाठ फिरविली होतो मात्र, यंदा पावसाने पावसानेच पाठ फिरवल्याने काही प्रमाणात पेरणी केलेल्या पिकांनी देखील आठ ते दहाच दिवसात मना टाकल्याने सर्वच शेतकऱ्यांचा पिक विमा भरण्याकडे कल असून तलाठी कार्यालयाबरोबरच सायबर कॅफेत सुद्धा मोठ्या प्रमणात शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे.

 शेतकऱ्यांना ऑनलाइन सातबारा मिळविण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागत असून, लवकरात लवकर तलाठ्यावरचा अधिकच भार कमी करून ज्या त्या सजातील गावात सात बारा उपलब्ध होईल याची सोय करावी”

- पंकज ठकारे,संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा

“ तालुक्यात अपुऱ्या मनुष्यबळा मुळे प्रत्येक तलाठ्याकडे एक ते दोन साजांचा अधिकचा भार देण्यात आला आहे.”

- जितेंद्र इंगळे,तहसीलदार बागलाण
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news BAGLAN TALUKA VILLAGE