हुश्‍श बांभोरी पुलाची झाली दुरूस्ती 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

जळगाव : महामार्गाची चाळण झाल्याने वाहनधारकांचा जीव धोक्‍यात असताना या मार्गाच्या दुरवस्थेमुळे धोकादायक बनलेल्या बांभोरीजवळील गिरणा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने खोडा घातला. अखेर पावसाने उघडीप दिल्यानंतर आज रात्री या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. 
महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेशाला जोडणारा दुवा म्हणून जळगाव शहरालगत बांभोरीजवळचा गिरणा नदीवरील पूल मानला जातो. मुंबई, नाशिक आणि गुजरातकडून राज्यात व पुढे विदर्भ, आंध्रप्रदेशाकडे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरुन जाता येते. त्यामुळे प्रचंड वाहतुकीचा हा महामार्ग आहे. 

या महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने शेतीचेच नव्हे तर रस्त्यांची देखील दुरवस्था झाली आहे. महामार्गावरील गिरणेवरील पूल तर अत्यंत धोकादायक बनला आहे. या पुलाची स्थिती बघता दुरुस्तीचे नियोजन महामार्ग प्राधिकरणाने केले होते. शनिवार पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार होते. मात्र, शुक्रवारी सायंकाळपासून पुन्हा पाऊस सुरू झाला. त्यामुळे शनिवारी होणारे पुलाच्या दुरुस्तीचे काम रखडले. अखेर पावसाच्या उघडिपीनंतर हे काम आज रात्री सुरू करण्यात आले आहे. 

पूल धोकादायक 
या महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडत असल्याने शेतीचेच नव्हे तर सर्वच क्षेत्रातील उत्पादनांचे नुकसान होत आहे. नवरात्रोत्सवापाठोपाठ दिवाळीही पावसाने धुवून काढली. अगदी नोव्हेंबर सुरू झाला तरी पाऊस थांबायला तयार नाही, त्यामुळे महामार्गच नव्हे तर सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. महामार्गावरील गिरणेवरील पूल तर अत्यंत धोकादायक बनला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bambhori girna river brige night durusti