Vidhan sabha : "जळगाव ग्रामीण'मध्ये बंडोबांची "थंडाई'! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

जळगाव : जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसेना- भाजप महायुतीत झालेल्या बंडखोरीवर दोन्ही पक्षांनी कडक कारवाईचा निर्णय घेतला आहे. बंडखोरांवर कडक कारवाई करण्याबाबत तंबी देण्यात आल्याने "बंडोबा' थंड झाले असून, त्यांनी महायुतीसोबत राहणार असल्याचे जाहीर केले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 

जळगाव : जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसेना- भाजप महायुतीत झालेल्या बंडखोरीवर दोन्ही पक्षांनी कडक कारवाईचा निर्णय घेतला आहे. बंडखोरांवर कडक कारवाई करण्याबाबत तंबी देण्यात आल्याने "बंडोबा' थंड झाले असून, त्यांनी महायुतीसोबत राहणार असल्याचे जाहीर केले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 

जळगाव ग्रामीण मतदारसंघात भाजप- शिवसेना महायुतीत मोठ्या प्रमाणात बंड झाले आहे. त्याची वरिष्ठ स्तरावरही आता दखल घेण्यात आल्याचे वृत्त आहे. महायुतीतील काही जणांनी थेट उमेदवारी दाखल केली आहे, तर काहींनी बंडखोरांना पाठिंबा देऊन प्रचार सुरू केला आहे. पक्षांतर्गत असलेल्या बंडखोरीवर कारवाई करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी हत्यार उपसले आहे. याबाबत अधिक माहिती प्राप्त झाली आहे. बंडखोरी करणाऱ्यांवर पक्षातर्फे कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंडखोर हे पक्षाचा झेंडा लावून नेते आपल्या पाठीशी असल्याची दिशाभूल करीत असल्याने वरिष्ठ स्तरावरील नेतेही संतप्त झाले आहेत. त्यांनी अशा प्रकारची कोणतीही बंडखोरी खपवून न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत थेट बंडखोरांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून तंबी दिल्याचे सांगण्यात येत आहे. भविष्यातील आपले राजकीय अस्तित्व धोक्‍यात येण्याच्या भीतीने त्यांनी समझोता केला असून, कोणत्याही प्रकारची पक्षविरोधी कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे "बंडोबा' थंड झाले आहेत. शिवाय, विरोधकांची ताकदही फारशी नाही. त्यामुळे "जळगाव ग्रामीण'मधील दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी महायुतीचे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होणारच, असा दावा केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bandkhor back jalgaon gramin vidhan sabha