विना नंबर अवजड वाहने महामार्गावरून; आरटीओचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 November 2020

बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. वाहनधारक जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करीत आहेत. त्यातच मोठ्या अवजड वाहनांची वर्दळ वाढल्याने रस्त्यामुळे अपघात नित्याचे झाले आहेत.

वडाळी (नंदुरबार) : बऱ्हाणपूर- अंकलेश्वर या मार्गावर विना नंबर प्लेट अवजड वाहनांचा सुळसुळाट वाढला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनातून नेमक्या कोणत्या मालाची वाहतूक केली जाते याबाबत तर्कवितर्क काढले जात असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या अशा वाहनांवर राज्य परिवहन विभाग कारवाई करेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. वाहनधारक जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करीत आहेत. त्यातच मोठ्या अवजड वाहनांची वर्दळ वाढल्याने रस्त्यामुळे अपघात नित्याचे झाले आहेत. या अपघातांमुळे कधी वाहनांचे नुकसान होते तर कधी चालकाला आपला जीव गमवावा लागतो. त्यातच विना नंबर प्लेट सुसाट वेगाने धावणाऱ्या अवजड वाहनास लहान मोठ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे या वाहनातून नेमकं कोणत्या मालाची वाहतूक केली जाते असा असा सामान्य प्रश्न पडत असून अशा सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनावरती कारवाई का होत नाही त्याला संबंधित पोलिस विभाग व परिवहन विभागाकडून मूकसंमती आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. 
 
अवैद्य मालाची तस्करी करण्यासाठी विनानंबर वाहनांचा वापर करतात. यातून अपघात झाल्यास किंवा तपासणी केल्यास चालक-मालक सहीसलामत त्यातून बाहेर पडतात. यासाठी अशा मार्गावर राज्य परिवहन विभाग व पोलिस यांची गस्त कायम ठेवणे गरजेचे आहे. 
-जयवंत पाटील, निवृत्त हवालदार, कुकावल 
 
ब्रहानपूर अंकलेश्वर विनानंबर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असून त्यांचा वेग देखील जास्त असतो. यामुळे एखाद्या वाहनधारकांना धडक दिल्यास नंबर प्लेट नसल्यामुळे अपघात ग्रस्तांसाठी मदत करणाऱ्याना मोठी अडचण तयार होते. चालक वाहन घेऊन पसार होतो. 
-राकेश माळी, अध्यक्ष, महात्मा फुले युवा मंच शेतकरी आघाडी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news barhanpur ankleswar highway non number plat truck