भडगाव शिवारात बिबट्याकडून 840 कडकनाथ, कावेरी कोंबड्या फस्त

दगाजी देवरे
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

म्हसदी : भडगाव-मा. (ता. साक्री) येथील भोकडखेत शिवारात रविवारच्या रात्री बिबट्याने कोंबड्याच्या बंदीस्त पोल्ट्रीत घुसत 840 कोंबड्याचा फडसा पाडला. अवघ्या चार महिन्यात तीन लाख खर्च केलेल्या कडकनाथ व कावेरी कोंबड्याची सर्व पोल्ट्री बिबट्याने फस्त केल्याने तरुण व्यावसायिक हतबल झाला आहे.

भडगाव येथील रावसाहेब ओंकार बेडसे या सुशिक्षित तरुणांने 'बोकडखेत' शिवारात खर्चिक असलेला कडकनाथ व कावेरी कोंबड्यांचा पोल्ट्री उभारला आहे. खर्चिक व्यवसाय असल्याने बेडसे कुटुंबास शेतात राहतात. रात्री एकच्या सुमारास बिबट्याने बंदीस्त जाळी उकरत कोंबड्यावर हल्ला चढविला. निम्मेपेक्षा अधिक कोंबड्या फस्त केल्या असून उर्वरीत भीतीने मृत झाल्या आहेत. पहाटे बेडसे पोल्ट्रीजवळ गेल्यावर मृत कोंबड्याचा ढिग पाहून धसका घेतला आहे. कडकनाथ 530 तर कावेरी 310 कोंबड्या फस्त झाल्या आहेत. काल सकाळी वनविभागास माहिती देण्यात आली. म्हसदीचे वनपाल एस.डी.देवरे,कर्मचारी भटू बेडसे आदींनी पचंनामा केला.बाजार समितीचे संचालक बारकू शंकर बेडसे, समाधान बेडसे, अरविंद मोहिते उपस्थित होते.

बिबट्याची वाढती दहशत
दरम्यान, गेल्या आठ दिवसापासून बोकडखेत शिवारात बिबट्याला अनेकांनी प्रत्यक्ष पाहिल्याची गावात चर्चा होती. शिवाय एक दिवसाआड बिबट्या नजरेस पडत असल्याची माहिती रावसाहेब बेडसे यांनी दिली.पोल्ट्रीस चौफेर तारेची मजबूत जाळी असताना बिबट्या एका बाजूने घुसत अन्य दुस-या बाजूने बाहेर निघाला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhadgaon bibtya 840 bird