भडगावच्या कल्पेशने चीनला मागे टाकत "गिनीज बुक'मध्ये सहभाग 

kalpesh sangvikar
kalpesh sangvikar

भडगाव : "लाईव्ह 1000' या ग्रुपने सादर केलेल्या संगीताची "गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे. एकाचवेळी 1 हजार 46 संगीतकारांनी सहभाग नोंदवत संगीताचे सादरीकरण केले. यामुळे या उपक्रमाची "गिनीज बुक'मध्ये नोंद झाली आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड चीनच्या नावे होता. "गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये भडगाव येथील कल्पेश सांगवीकर याच्या रूपाने पहिल्यांदाच एका तरुणाचा सहभाग नोंदवला गेला आहे. 
"ऍमेझॉन'ने प्राईम व्हिडिओ या ग्रुपद्वारे "फॉरगोटन आर्मी' या चित्रपटाच्या गाण्यावर जागतिक रेकॉर्ड करण्याचा मानस व्यक्त केला होता. कबीर खान दिग्दर्शित चित्रपटातील "आझादी के लिये' या गाण्यावर 24 जानेवारीला मुंबईतील टुलीप स्टार या हॉटेलमध्ये हा रेकॉर्ड झाला. एकाचवेळी 1 हजार 46 संगीतकारांनी हे गाणे संगीतबद्ध केले. यापूर्वी चीनमधील 953 संगीतकारांनी एकत्र येऊन गाणे संगीतबद्ध केले होते. 

अन्‌ चीनचा रेकॉर्ड काढला मोडीत 
लाईव्ह ग्रुपने चीनचा हा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. विशेष म्हणजे 1000 लाईव्ह ग्रुपमध्ये भडगाव येथील कल्पेश सांगवीकर देखील सहभागी झाले होते. त्यामुळे भडगावच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. यावेळी कबीर खान, प्रीतम चक्रवर्ती, सनी कौशल, शर्वरी वाघ यांच्यासह "गिनीज ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'चे अधिकारी स्वप्निल डांगरीकर उपस्थित होते. कल्पेश सांगवीकर हा येथील रजनीताई देशमुख महाविद्यालयाचे भूगोल विभागाचे प्रा. एल. जी. कांबळे यांचा मुलगा आहे. त्याचा या उत्तुंग भरारीबद्दल माजी आमदार दिलीप वाघ, विद्यमान आमदार किशोर पाटील, "पीटीसी'चे चेअरमन संजय वाघ, डॉ. संजीव पाटील, नगराध्यक्ष अतुल पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार, नगरसेविका योजना पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल पाटील, प्राचार्य एन. एन. गायकवाड, माजी विद्यार्थी संघाचे गणेश परदेशी, मास्टरलाईन फाउंडेशनचे समीर जैन, सुयोग जैन, जागृती मंडळाचे प्रा. दीपक मराठे, विजय देशपांडे, नरेंद्र पाटील, राजा शिवछत्रपती बहुउद्देशीय संस्थेने कौतुक केले. 

कल्पेशने संगीतबद्ध केलेले अनेक गाणे 
कल्पेश सांगवीकरने संगीतबद्ध केलेली काही गाणी प्रदर्शित झाली आहेत. लाईव्ह ग्रुपमध्ये त्याची एका ऑडीशनने निवड झाली होती. ज्यात त्याने गिटार वाद्य वाजविले आहे. यात देशभरातून नवोदित संगीतकार सहभागी झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com