भडगाव नगरपरिषद मतदार यादीतून दीड हजार नावे गायब 

voter list
voter list

भडगाव : येथील नगरपरिषदेच्या मतदार यादीतून अनेकांची नावे गायब झाले आहेत. इच्छुक उमेदवार माजी स्वीकृत नगरसेवक सचिन चोरडीया यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचे नावे शहराच्या मतदार यादीत आलेले नाहीत. विरोधकांनी प्रशासनाला हाताशी घेत माझ्या कुटुंबियांचे नाव उडविल्याचा आरोप सचिन चोरडीया यांनी पत्रकार परिषदेत केला. याबाबत वेळ आल्यास उच्च न्यायालयात जाऊ असा इशारा त्यांनी दिला आहे. 

भडगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी आज प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. यात विधानसभा निवडणुकीच्यावेळी शहरातील एकूण मतदानापैकी १ हजार ६८४ मतदारांचे नावे कमी आल्याचे समोर येत आहे. याबाबत आज माजी स्वीकृत ननगरसेवक सचिन चोरडीया यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, या मतदार याद्यापैकी प्रभाग क्रमांक ५ व प्रभाग क्रमांक ८ मधील मतदार याद्यांची पाहणी केली असता. मतदार यादीतून सचिन चोरडीया, पत्नी पौर्णिमा चोरडीया वडील विनोदकुमार जैन, आई कलावती जैन, काका प्रमोदकुमार जैन, कांतीबाई जैन, अर्चना चौरडीया ही गावे गायब करण्यात आली आहे. शहरातील १ हजसा ६८४ मतदाराची नावे गायब करण्यात आली आहेत. माझ्या परीवारातून मी स्वत: प्रभाग क्रमांक ८ मधून तर माझी पत्नी पौर्णिमा चोरडीया प्रभाग क्रमांक ५ मधुन उमेदवारी करण्यास इच्छुक आहोत. त्यामुळे हा प्रकार विरोधक व प्रशासनाने संगनमताने केले आहे. गेल्या दहा दिवसापूर्वीच 
कुणकुण लागल्याने याबाब तक्रारराज्य निवडणुक आयोगसह जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. संपुर्ण परीवाराचे नावासह गायब झालेल्या नावाचा मतदार यादीत समाविष्ठ करण्यात यावा, अन्यथा न्यायालयात जाऊ असेही श्री. चोरडिया यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com