भडगाव नगरपरिषदेचा 'तो' संदेश शहरवासीयांना भावला! 

corona massage
corona massage

भडगाव : येथील नगरपरिषदेने नागरिकांनी विनाकारण बाहेर पडु नये यासाठी मुख्य रस्त्यावर संदेश लिहून नागरीकांमधे जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यां या विधायक उपक्रमाची सकारात्मक  जनमानसात चर्चा दिसुन येत आहे.
सध्या कोरोनाच्या पाश्वभुमीवर देशात 14 तारखेपर्यंत संचारबंदी आहे. मात्र तरीही काही नागरीक विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे पहावयास मिळत आहे. पार्श्वभूमीवर भडगाव नगरपरिषदेने  शहरातील मुख्य रस्त्यांवर नागरिकांमधे जनजागृती करण्यासाठी संदेश लिहले आहे." आपण खरच कामासाठी बाहेर पडताय का?  विनाकारण फिरत असाल तर कुटुंब व शहराला धोक्यात आणात आहात." असा मजकूर या संदेशात लिहला आहे. हा पालिकेने रस्त्यावर लिहिलेला मजकूर प्रभावी ठरतानां दिसत आहे. सोशल मिडीयावर हा संदेश असलेले फोटो फीरले. नरगपरीषदेच्या या विधायक उपक्रमाचे शहरवासीयांकडुन कौतुक केले जात आहे.  
 
नागरिकांनी या संदेशाला सकारात्मकपणे घेऊन विनाकारण घराबाहेर फिरू नये आणि इतरांना विनाकारण बाहेर न फीरण्याबाबत आग्रह धरावा. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे..
- विकास नवाळे मुख्याधिकारी नगरपरिषद भडगाव
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com