आदित्य ठाकरेंना कुटुंबियांच्या शुभेच्छा !  छगन भुजबळ, खडसे राष्ट्रवादीत आल्यास त्यांचे स्वागत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

नाशिकः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातील पहिले सदस्य शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी वरळीतून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांनी कुटुंबियांतर्फे शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भाजपची उमेदवारी न मिळाल्याने "वेटिंग'वर असलेले माजीमंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत दाखल होताहेत, अशी चर्चा सुरु झाल्याने भुजबळांनी खडसे

राष्ट्रवादीत आल्यास त्यांचे स्वागत असेल, अशी प्रतिक्रिया दिली. 
इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार हिरामण खोसकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भुजबळ पोचले होते. खोसकरांचा अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले, की ठाकरे घराण्याने आजपर्यंत माझ्यासहित अनेकांना नगरसेवक, महापौर केले. पण बाळासाहेब अथवा उद्धव यांनी निवडणूक लढवली नाही. आदित्य यांच्या निमित्ताने महाराष्ट्रात एक तरुण पुढे येतोय. 

मित्रपक्षांना दोन जागा 
कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये मित्रपक्षांना नाशिक पूर्व आणि पश्‍चिम या दोन जागा सोडण्यात आल्या आहेत. नाशिक पूर्व ही जागा प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पक्षाला, तर नाशिक पश्‍चिमची जागा डाव्या आघाडीला देण्यात आली आहे. या जागांवरील उमेदवारीसंबंधीचा निर्णय पक्ष घेईल, असेही भुजबळांनी म्हटले आहे. 

बहुजनांना डावलल्याने भाजपमध्ये नाराजी 
राज्यात उमेदवारी देताना पक्षातील निष्ठावंत आणि बहुजन समाजातील उमेदवार डावलले जात आहेत. मंदी आणि बेरोजगारी यासारखे प्रमुख प्रश्‍न दुर्लक्षित आहेत. त्यामुळे भाजपमध्ये नाराजी आहे. परिणामी, भाजपविरोधी लाटेचा फायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला होईल, असा दावा भुजबळांनी केला. भाजपने उमेदवारी नाकारलेले उमेदवार संर्पकात असल्याविषयी विचारले असता भुजबळांनी खुबीने उत्तर टाळले. सगळेच माझ्या संर्पकात असतात. सगळे पत्रकारही संर्पकात असतात, असे उत्तर त्यांनी दिले

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhujabal says