छगन भुजबळांचे नाशिकमध्ये जंगी स्वागत,महाराष्ट्रातील जनतेचे आभार

live photo
live photo

नाशिकः माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांचे शिवाजीरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ दुपारी चार वाजता जंगी स्वागत करण्यात आले. ढोल ताशांच्या गजर, फटाक्‍यांची आतषबाजी, शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार, डोक्‍यावर "मी भुजबळ' टोपी आणि भुजबळ साहेब आगे बढोच्या घोषणा अशा वातावरणात त्यांचे स्वागत करण्यात आले.
 

छगन भुजबळ यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी त्यांचेसोबत आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते. या तिघांचेही निळा फेटा बांधून तसेच महिलांनी औक्षण करून स्वागत करण्यात आले. वकील संघटनेतर्फे त्यांना संविधानाची प्रत भेट देऊन सत्कार करण्यात आला. शहरातील विविध संघटनांतर्फेही त्यांचा यावेळी शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दुपारी 12 वाजेपासूनच समर्थकांची या ठिकाणी गर्दी झाली होती. त्यांचे आगमन होताच समर्थकांची त्यांची छबी कॅमेऱ्यात टिपण्यासाठी धडपड सुरू होती. नगरसेवक गजानन शेलार, माजी नगरसेविका कविता कर्डक, बाळासाहेब कर्डक, राजेंद्र बागुल, निवृत्ती अरिंगळे, संजय खैरनार, मोतीराम पिंगळे, धनंजय निकाळे, दिलीप दोंदे, रवींद्र जाधव, रवी हिरवे यांच्यासह शेकडो समर्थक यावेळी उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com