प्रकृती अस्वथामुळे छगन भुजबळ रूग्णालयात दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

नाशिकः  राज्याचे माजी उपमुख्यमंत्री,राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते आ. छगन भुजबळ यांना आज सकाळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे  मुंबईच्या जसलोक रूग्णालयात दाखल करण्यात आले. विधानसभा निवडणूकीच्या काळात श्री.भुजबळ यांनी नाशिक जिल्हा आपल्या सभांद्वारे पिंजून काढला होता. मतदारांच्या गाठीभेठी,चौकसभांद्वारे त्यांनी संवाद साधला. मतदान,मतमोजणी त्यानंतर मुंबईतील पक्षाच्या बैठकां या सततच्या धावपळीमुळे त्यांची प्रकृती ठिक नव्हती, आज अस्वस्थ वाटू लागल्याने अखेर उपचारासाठी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.डॉक्टरांनी उपचार करत विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhujbal in hospital