समीर भुजबळांचा जॉगिंग ट्रॅकवर "मॉर्निंग वॉक', नागरिकांशी साधला संवाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

नाशिक - नाशिक लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी आज सकाळी कृषी नगर व हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील जॉगिंग ट्रॅकवर "मॉर्निंग वॉक' करतं ट्रॅकर्सशी संवाद साधला. समस्या जाणून घेताना सोडविण्याचे आश्‍वासन श्री. भुजबळ यांनी दिले. यावेळी डॉ. शेफाली भुजबळ देखील समवेत होत्या.

नाशिक - नाशिक लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी आज सकाळी कृषी नगर व हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील जॉगिंग ट्रॅकवर "मॉर्निंग वॉक' करतं ट्रॅकर्सशी संवाद साधला. समस्या जाणून घेताना सोडविण्याचे आश्‍वासन श्री. भुजबळ यांनी दिले. यावेळी डॉ. शेफाली भुजबळ देखील समवेत होत्या.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार समीर व पत्नी डॉ. शेफाली भुजबळ यांनी निवडणुकीच्या निमित्ताने आज सकाळी प्रथम कृषी नगर जॉगिंग ट्रॅकवर ट्रॅकर्सची संवाद साधला. जेष्ठ नागरिकांच्या वतीने श्री. भुजबळ यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी शहरात जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरु करण्याची मागणी करण्यात आली. नाशिक मधील क्रिडा प्रेमींच्या क्रिडा गुणांना चालना देण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सुचना करण्यात आल्या. नियमित जॉगिंग ट्रॅकवर येणाऱ्या नोकरदार महिला, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही भुजबळ यांची भेट घेवून समस्या मांडल्यानंतर त्या सोडविण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. कान्हेरे मैदानावरील जॉगिंग ट्रॅक येथे नागरिकांनी भुजबळ यांचे स्वागत केले. नाशिकच्या क्रीडा विश्‍वात कविता राऊत, मोनिका आथरे,अंजली ठमके यांसारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडापटूंनी नाव कमविले. त्यामुळे नाशिक मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील मैदाने, स्पोर्ट क्‍लबची उभारणी करण्याची मागणी करण्यात आली. नाशिकच्या क्रिडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे वचन त्यांनी दिले.

गंगापूर रोड भागात प्रचार फेरी
दरम्यान आज गंगापूररोड परिसरातून समीर भुजबळ यांनी प्रचार फेरी काढली. माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, कॉंग्रेसच्या प्रवक्‍त्या डॉ.हेमलता पाटील, नाना महाले, माजी आमदार जयवंत जाधव, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नगरसेवक समीर कांबळे, निलेश खैरे, हर्षा फिरोदिया, पूनम वीर, अनिता दामले आदी उपस्थित होते. नरसिंह नगर येथील स्वामी समर्थ मंदिर, आनंदनगर, मॉडर्न मार्केट, पूर्णवाद नगर, नहुष सोसायटी, श्रमिक कॉलनी, तुळजाभवानी मंदिर, गीतांजली सोसायटी, श्रीरंगनगर, सागर स्वीट्‌स या मार्गाने प्रचार फेरी काढण्यात आली. ठक्कर रिट्रेट येथील गणपती मंदिराजवळ सांगता करण्यात आली.

Web Title: marathi news bhujbal morning walk