छगन भुजबळांची प्रकृती खालावली 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

नाशिकः दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी मार्च 2016 पासून तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती खालावली आहे. सध्या ते मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात असून गेल्या आठ दिवसांमध्ये त्यांचे वजन दहा किलोने कमी झाले आहे. 

श्री. भुजबळ यांनी प्रचंड अशक्तपणा आला आहे. खोकल्यामुळे रात्रभर त्यांना झोप येत नाही. ही सारी परिस्थिती काल (ता. 26) मुंबईत ईडीच्या न्यायालयात तारखेसाठी श्री. भुजबळ यांना आणले असताना पाह्यला मिळाल्याचे भेटीवेळी उपस्थित असलेल्यांनी सांगितले. आमदार जयवंत जाधव, उत्तरप्रदेशचे माजी मंत्री बाबूसिंग कुशवाह, राष्ट्रवादीचे नाशिकचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ऍड्‌. रवींद्र पगार, दिलीप खैरे आदींनी त्यांची भेट घेतली. 
 
Web Title: marathi news bhujbal treatment