भुजबळ माणिकरावांच्या भेटीने उडाला राजकीय धुरळा, तर्कवितर्कांना उधान 

live
live

येवला : उमेदवारी मागणारे अन उघडपणे बंडाचा झेंडा हाती घेतलेले राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस माणिकराव शिंदेच्या रायगडावर आज मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेल्या हेवीवेट नेते छगन भुजबळांचा ताफा 
पोहोचला..काही मिनिटात सोशल मीडियावर फोटोही व्हायरल झाले आणि एकच चर्चा अख्ख्या मतदारसंघात सुरू झाली.. या भेटीत राजकीयदृष्ट्या ब्र शब्दही चर्चा झाली नसली तरी विविध तर्कविर्तकाना उधाण आले आहे.

    गेल्या काही महिन्यांपासून एकाच पक्षात असूनही भुजबळ व शिंदेमध्ये दुरावा तयार झाला आहे.नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भुजबळ समर्थकांनी साथ न दिल्याचा आरोप शिंदेचा असून यामुळे ते नाराज होते. त्यातच गेल्या महिन्यात शिंदेनी २००४ ला दिलेला विधानपरिषद आमदारकीचा शब्द न पाळल्याने वर्तमानपत्रातून आता तरी मला येवल्यातून विधानसभेसाठी संधी द्या असे साकडे पत्राद्वारे भुजबळांना घातले होते.त्यानंतर भुजबळांच्या दौऱ्यात शिंदे गेलेच नाही. भुजबळांनीही संवाद साधला नव्हता.राष्ट्रवादीत असूनही भुजबळांच्या विरोधात भूमिका घेऊन भूमिपुत्र आमदार असावा असे गेल्या आठवड्यातच शिंदे उघडपणे म्हणाले होते.

    या सर्व पार्श्वभूमीवर आज अचानक भुजबळ रायगडावर पोहोचले.
रविवारी माणिकभाऊंचा वाढदिवस असल्याने ही शुभेच्छा भेट असल्याचा कयास लावला गेला पण प्रत्यक्षात भुजबळांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाही.बाजार समितीच्या सभापती उषाताई शिंदे यांच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली असल्याने त्यांना भेटण्यासाठी भुजबळ पोहोचले होते व ते बोललेली तेवढेच..विशेष म्हणजे भुजबळांनी ताईशी चर्चा करत शस्त्रक्रियाविषयी माहिती घेतली. दरम्यान त्यांनी अधून-मधून माणिकभाऊ व नगरसेवक डॉ. संकेत शिंदेशी आजारपणा बद्दलच चर्चा केली.

   साधारणता पंधरा मिनिटांच्या या भेटीत दोघांमध्ये राजकीय ब्र शब्दही चर्चा झाली नाही. अचानकपणे विरोधात भूमिका मांडणाऱ्या नेत्याच्या घरी जाऊन राजकारणावर काहीही न बोलता फक्त भेट देऊन भुजबळांनी तालुक्याचे राजकारण ढवळून काढले आहे.भेटीमागे कारण काहीही असो पण आगामी राजकारणाचे संकेत यात दडलेले आहे हे नक्की.
शुभेच्छा देणे टाळले
    माणिकरावांच्या वाढदिवसासाठी रविवारी रायगडावर शिवसेना भाजपासह सर्वपक्षीयांची गर्दी झाली होती.सर्वत्र बनर देखील झळकले पण भुजबळांनी शुभेच्छा न दिल्याची सल कुटुंबियांना लागली.अर्थात या भेटीने राजकीय भूमिका बदलली नाही हेही शिंदे आवर्जून सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com