भुसावळ जनआधार विकास पार्टीचे चार नगरसेवक अपात्र 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

भुसावळ : पालिकेच्या पहिल्याच सभेत गोंधळ घालून मुख्याधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी जनआधार विकास पार्टीच्या चार नगरसेवकांना नगरविकास विभागाने अपात्र केले असून पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी घातली आहे. याआदेशाने पालिकेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 

27 मार्च 2017 ला भुसावळ पालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत जनआधार विकास पार्टीचे गटनेता उल्हास भीमराव पगारे, रवींद्र सपकाळे, पुष्पा जगन सोनवणे, संतोष चौधरी यांनी मुख्याधिकाऱ्यांना बाहेर काढा अशा घोषणा देत धक्काबुक्की केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल असून तत्कालीन मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर यांनी जनआधारच्या नगरसेवकांवर कारवाईबाबत नगरविकास विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर चर्चा होवून दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जनआधार विकास पार्टीचे गटनेता उल्हास भीमराव पगारे, रवींद्र सपकाळे, पुष्पा जगन सोनवणे, संतोष चौधरी यांना अपात्र केले असून पुढील पाच वर्ष निवडणूक लढवण्यासाठी बंदी घातली आहे. याबाबतचे आदेश आज नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी काढले.

Web Title: marathi news bhusaval nagar palika 4 nagar sevak