esakal | न्यायालयात युक्‍तिवाद तो देखील व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे 
sakal

बोलून बातमी शोधा

court

आरोपी काही दिवसापासून जेलमध्ये होते आरोपी च्या वतीने व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा जामीन अर्जाची सूनवणी करण्यात आली. मारूळ (ता. यावल) येथे मागील महिन्यात दोन समाजामधील आपसात दंगल झाली होती,

न्यायालयात युक्‍तिवाद तो देखील व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : भुसावळ जिल्हा न्यायालयातील इतिहासामध्ये पहिल्यांदा व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा जामीन अर्जाची युक्तिवाद  करण्यात आला.

भुसावळ जिल्हा न्यायालयातील जिल्हा न्यायालय मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा युक्तिवाद सुरू करण्यात आला. आरोपी काही दिवसापासून जेलमध्ये होते आरोपी च्या वतीने व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा जामीन अर्जाची सूनवणी करण्यात आली. मारूळ (ता. यावल) येथे मागील महिन्यात दोन समाजामधील आपसात दंगल झाली होती, त्यामध्ये एकमेकांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता व एका गुन्ह्यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आलेली होती. सध्या पूर्ण भारतात कोरोना वायरस मुळे लॉक डाऊन करण्यात आला असल्यामुळे कोर्टामध्ये अति तातडीचे सुनावणीसाठी न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे युक्तिवाद करण्याचे सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्दशनास नुसार भुसावळ जिल्हा न्यायालय मध्ये जमिनीच्या अर्जामध्ये व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी सुरू करण्यात करण्यात आली. आरोपीतर्फे भुसावळ येथील ऍड. मनीष सेवलानी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे युक्तिवाद करण्यात आला व आरोपींना तात्पुरता जामीन जिल्हा न्यायाधीश भंसाली यांनी मंजूर केला व त्याप्रमाणे आरोपींना दिनांक 5 मे 2020 पर्यंत रक्कम रुपये 15000 च्यापीआर बॉण्ड वर सोडण्यात आले. आरोपीतर्फे भुसावळ येथील एडवोकेट मनीष सेलानी सेवलानी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे युक्तिवाद केला व त्यांना एडवोकेट जावेद मेमन यांनी सहकार्य केले. तसेच दुसऱ्या खटल्यात भुसावळ येथील एडवोकेट जगदीश कापडे यांनीसुद्धा व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे युक्तिवाद केला.
 

loading image