भुसावळात चाकूने भोसकून तरुणीची हत्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

भुसावळ : एकतर्फी प्रेमातून तरुणीची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना शहरातील लोणारी मंगल कार्यालयाजवळील हुडको कॉलनी येथे आज घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. यातील संशयितास पोलिसांनी अटक केली. 

भुसावळ : एकतर्फी प्रेमातून तरुणीची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना शहरातील लोणारी मंगल कार्यालयाजवळील हुडको कॉलनी येथे आज घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. यातील संशयितास पोलिसांनी अटक केली. 

ूमृत तरूणीचे नाव प्रीती ओंकार बागल (वय २२, रा. भुसावळ) असे आहे. आज पाणी भरत असताना संशयित सागर विष्णू इंगळे (वय २७) हा या ठिकाणी आला. तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझी बदनामी करेल, असा दम त्‍याने तरूणीला दिला. यानंतर त्याने खिशातून चाकू काढून सरळ तिच्या पोटात खुपसला. यावेळी तरुणी जमिनीवर कोसळली. त्या मुलीच्या कमरेवर पाय ठेवून चाकू काढून दुसरा वार केला. तरूणी जखमी अवस्थेत सैरावैरा पळू लागली. ती जिवाच्या आकांताने बचावासाठी समोरच्या घरात घुसली. तेथेही या तरुणाने तिचा पाठलाग करून हल्ला चढविला व ती गतप्राण झाली. संशयित इंगळे हा वार केल्यानंतरही घटनास्थळी रिक्षाच्या आडोशाला उभा होता. यावेळी पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी येऊन त्यास ताब्यात घेतले. 

संशयित इंगळे यांचा गेल्या काही दिवसांपासून प्रीतीला खूपच त्रास होता. या त्रासाला कंटाळून तिच्या बहिणीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली होती. मात्र, पोलिसांनी त्यांना थातूरमातूर कारण सांगून जीवाची भीती दाखवून तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली. असा आरोप प्रीतीच्या बहिणींनी केला आहे. तिच्‍या पश्‍चात आई व पाच बहिणी आहेत. प्रीतीने आयटीआय करून रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप दिली होती. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. शवविच्छेदनासाठी मृतदेह पालिकेच्या दवाखान्यात नेण्यात आला आहे. 
 
संशयित इंगळे चालक 
संशयित प्रवीण विष्णू इंगळे (२७, राहुल नगर, भुसावळ) या डीआरएम कार्यालयातील खाजगी वाहनांवर चालक म्हणून कामास होता, मात्र काही कारणास्तव त्याने नोकरी सोडल्यानंतर त्याने खाजगी वाहनावर काम सुरू केले आहे. प्रेमसंबंधातील तरुणीच्या सहा पैकी पाच बहिणी विवाहित आहेत. रात्री उशिरापर्यंत आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे तपास करीत आहेत. 

Web Title: marathi news bhusawal gilr one side love murder