भुसावळ विभागात ओल्या दुष्काळाचे सावट 

live photo
live photo

भुसावळ : विभागात गेल्या दहा दिवसापासून कधी मुसळधार, कधी मध्यम तर कधी तुरळक स्वरुपाचा पाऊस होत आहे. सलग तीन दिवसापासून संततधार आहे. सूर्याचे दर्शन नाही. पावसाच्या पाण्याने बहूतेक धरणे ओव्हर प्लो झालीत आहेत. हतनूरच्या धरणाचे दुसऱ्या दिवशी सर्व ४१ दरवाजे उघडले असल्याने तापी दुथळी भरून वाहत आहे. विभागातील सर्वच नद्या नाल्यांना पूर आला आहे. नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला. अनेक गावांमध्ये घरांची पडझड झाली आहे. बहूतेक शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके खराब होत आहेत. 

ारावेर तालुक्यात सुकी, गंगापुरीसह तालुक्यातील सहा ही मध्यम व लघु प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. तापी नदीसह तालुक्यातील सुकी, भोकर, बोकड, नागोरी यासह सर्वच नदी नाल्यांना पुर आले आहेत. हतनुर धरणाच्या बॅक वॉटरमुळे तालुक्यातील नदी काठच्या गावांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. दोन दिवसात ९३ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. सात ऑगस्टपासून तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. सुकी, बोकड, अभोडा, नागोरी नदी, मात्राण, नागझिरी या नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आले आहेत. सुकी (गारबर्डी), अभोरा, गंगापूरी, मात्राण, चिंचाटी धरणे भरली आहेत. या पावसामुळे तालुक्यातील भुजल पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्यास मदत होणार आहे. 

नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा 
पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी मोठ्या प्रमाणावर पाणी नदीपात्रात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्राकडे जाऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे पोलिसपाटील, ग्रामसेवक, तलाठी यांनी गावात दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

वाहतुक व्यवस्था विस्कळीत 
सर्वच नदी-नाले, ओढ्यांना पुराचे पाणी असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर काही नद्यांचे पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने येथील जनसंपर्क तुटला आहे. पुलावरून पाणी असल्यामुळे तालुक्यातील रावेर - मुक्ताईनगर दरम्यान पुनखेडा गावाजवळील पुलावरून तसेच पातोंडी गावात हतनूर धरणाचे बॅकवॉटर व निंभोरासिम जवळ बॅक वॉटर, खिरवड, नेहेते, दोधे, धूरखेडा, रावेर, जिन्सी, अभोडा, उटखेडा, चिनावल, कुंभारखेडा खिरोदा, रावेर, अजंदा, ऐनपुर, विटवा, निंबोल रस्त्यावरील पुलावरून पाणी तसेच धरणाचे बॅक वॉटर असल्यामुळे एसटी बसेस बंद करण्यात आल्या आहेत. 

दोन दिवसात साडे तीन इंच पाऊस 
तालुक्यात दोन दिवसात ९३.७१ मिलीमीटर असा ३.६८ इंच पाऊस पडला आहे. विविध मंडळ क्षेत्रात आज सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस मिलीमीटर मध्ये पुढीलप्रमाणे- रावेर - ५६ (५६१), खानापुर - ५८ (३७२), निंभोरा बुद्रूक - ४३ (३२४), खिर्डी बुद्रूक - ४६ (४५३), ऐनपुर- ४२ (३७४), सावदा - ५९ (४७४), खिरोदा प्र. या- ६१ (४७) आजची सरासरी- ५२ .१४ मिलीमीटर असून तालुक्यात आतापर्यंत सरासरी- ४४o.४१ मिलीमीटर ६२.९१ टक्के पाऊस तालुक्यात पडला. 

दसनूर येथे सुकी नदीला ११११ नारळ अर्पण 
तालुक्यातील दसनूर येथे सुकी नदीला पूर आल्याने ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.रात्रभर सुरू असलेल्या पावसाने सुकी नदीवरील गारबर्डी धरण पहाटे भरून ओसंडून वाहू लागले आणि पाणी सुकी नदीपात्रात आले. पाण्याचा वेग इतका होता की दुपारी तीन वाजता ते दसनुर पर्यंत पोचले. सध्या श्रावण महिना सुरु असून येथील उमेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर प्रसिद्ध आहे. ग्रामस्थांनी गावात आवाहन करून ११११ नारळ गोळा केले. दुपारी तीन वाजेच्या सुमारास सुकी नदीचे पाणी दसनूर गावापर्यंत पोहोचले. ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. उपसरपंच सचिन पाटील यांच्या हस्ते सपत्नीक जलपूजन करण्यात आले. यावेळी ११११ नारळ वाढवून संपूर्ण गावात प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी भागवत पाटील, विशाल पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते महेश चौधरी उपस्थित होते. 

पिकांचे नुकसान 
गेल्या २९ जूलैपासून एक दोन दिवस वगळता सतत भिज पाऊस सुरु आहे. या अतिपावसामुळे पिकांवर विपरित परिणाम झाला आहे. दोन-तीन दिवस असाच पाऊस राहिल्यास पिके सडून ओला दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com