चप्पल घालुन धावणाऱ्या वीट कामगाराच्या मुलाने जिंकली भुसावळ मॅरेनॉथ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

भुसावळ ः पायात केवळ साध्या चप्पला असतांना तसाच धावत वीट कामगाराचा मुलगा विशाल कुंभार यांने रन फॉर भुसावळ या मॅरेथॉन स्पर्धेत दहा किलोमीटर गटात प्रथम क्रमांक पटकावला.जळगाव पोलीस विभागातर्फे आयोजित ही मॅरेथॉन स्पर्धा आज उत्साहात पार पडली. 

भुसावळ ः पायात केवळ साध्या चप्पला असतांना तसाच धावत वीट कामगाराचा मुलगा विशाल कुंभार यांने रन फॉर भुसावळ या मॅरेथॉन स्पर्धेत दहा किलोमीटर गटात प्रथम क्रमांक पटकावला.जळगाव पोलीस विभागातर्फे आयोजित ही मॅरेथॉन स्पर्धा आज उत्साहात पार पडली. 
गेल्या काही दिवसा पासून या स्पर्धेची तयारी सुरु होती. उपविभागीय पोलिस अधिक्षक निलोत्पल यांनी याबाबत पुढाकार घेतला होता. यावल रस्ता, गांधी पुतळा आदी भागात आकर्षक फुग्यांची सजावट करण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर (डी.एस.ग्राऊंड) आकर्षक मंच उभारण्यात आला होता. शिवाय स्पर्धेचा मार्ग दाखविणारे मोठे होर्डिग, सेल्फि पाईंट व इतर स्टॉल्स लक्ष वेधुन घेत होते. पहाटे साडे पाच वाजे पासूनच पिवळे टिशर्ट घातलेले अबाल वृध्द मैदानावर जमण्यास सुरवात झाली होती. अँकरींग करणारे सुयश न्याती आपल्या खास शैलीत स्पर्धकांचा उत्साह वाढवित होते. बघता बघता स्पर्धेकांनी मैदान भरुन गेले. तीन, पाच व दहा किलोमीटर अंतर अश्‍या तीन गटात ही स्पर्धा पार पडली. आधी सर्वांचे पवन टाक यांच्या डान्स ग्रुपच्या नेतृत्वाखाली वॉर्नअप करण्यात आले. यावेळी सैराट गाण्याच्या तालावर सगळ्यांनीच व्यायाम केला. दहा किलोमीटरच्या स्पर्धेला प्रथम सुरवात झाली. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे, रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक आर. के. यादव, दिपनगरचे मुख्य अभियंता आर. आर. बावस्कर, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, उद्योजक मनोज बियाणी आदींनी हिरवी झेंडी दाखवली. दहा किलोमीटर गटात विशाल कुंभार यांने प्रथम क्रमांक पटकावला. त्याने हे अंतर 34 मिनीट 56 सेकंदात पुर्ण केले. तर अमोल पाटील याने व्दितीय (37 मिनीट11सेंकंद) व सतिश शेजवळ याने तृतीय (40 मिनीट41सेंकंद) क्रमांक पटकावला. दहा किलोमीटर मध्ये महिलांचाही सहभाग होता. त्यात अश्‍विनी काटोले यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी हे अंतर 43 मिनीट 27 सेकंदात पार केले. स्पर्धेतील इतर गटातील विजेते पुढील प्रमाणे ः तीन किलोमीटर ः प्रथम-प्रथमेश व्यवहारे, व्दितीय-ऋषीकेश पाटील, तृतीय-संभाजी पाटील, तीन किलोमीटर (ज्येष्ठ नागरीक) ः प्रथम-प्रकाश तायडे, व्दितीय-प्रेमराज लढे, तृतीय-लिलाधर अग्रवाल, तीन किलोमीटर (महिला) ः प्रथम-मोहिनी जगदे, पाच किलोमीटर ः प्रथम-मयुर सोनवणे, व्दितीय-मॅन्युअल फर्नांडिस व राहुल पाटील, तृतीय-उमेश पाटील, पाच किलोमीटर (महिला) प्रथम ः नय्यमा जोसेफ. ही स्पर्धा आमदार संजय सावकारे, सिध्दिविनायक ग्रुप, गोदावरी फांऊंडेशन, बियाणी ग्रुप, साई जीव सुपर शॉप यांनी प्रायोजित केली होती. यावेळी सिध्दिविनायक ग्रुपचे प्रमुख कुंदन ढाके, विभागीय अप्पर रेल्वे व्यवस्थापक मनोज सिन्हा, रेल्वेचे सिनीअर डीएमई एम. एस. तोमर, कर्नल निंबाळकर, कर्नल राणा, भुसावळ आयुध निर्माणीचे व्यवस्थापक राजीव पुरी, वरणगावचे एस. चटर्जी, आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुनिल पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील यांची विशेष उपस्थिती होती. 

अंबोले यांनी बुटासाठी दिले एक हजार रुपये 
विशाल हा विटा तयार करणाऱ्या कामगाराचा मुलगा असुन त्याचे वडिल सुरत येथे विट भट्टीवर काम करतात. डांभुर्णीय येथे तो एकटाच राहतो. परिस्थिती हालाखीची असल्याने तो चप्पल घालुनच धावतो हे समजताच हॉटेल व्यवसायीक युवराज अंबोले यांनी त्याला तात्काकाळ एक हजार रुपयाची रोख मदत बुट घेण्यासाठी दिली. या व्यतिरीक्त काही मदत लागल्यास यावल रोड वरील माझ्या हॉटेलवर येऊन भेट असेही सांगितले. या अचानक मिळालेल्या पैश्‍याने विशाल भारावुन गेला. 

मित्रामुळे धावण्याची प्रेरणा 
मला धावण्याची प्रेरणा माझा मित्र निलेश कोळी याच्या मुळे मिळाली. त्यामुळे मी आठवी पासुनच नियमीत धावण्याचा सराव करीत आहे. असे विशाल कुंभार यांने सकाळ शी बोलतांना सांगितले. पुढे तो म्हणाला रोज मी चार ते पाच किलोमीटर धावण्याचा सरावकरतो. बऱ्याच वेळा त्यापेक्षाही जास्त अंतर पार केले जाते. मी सध्या चिंचोली येथील सार्वजनिक विद्यालयात अकरावी वर्गात शिकत असुन भविष्यात मला पोलिस व्हायचे आहे अशी इच्छा कुंभार यांने व्यक्त केली. 

Web Title: marathi news bhusawal marethon kamgar winners