नागपूर पॅसेंजर महिन्याभरासाठी रद्द ! 

train
train

भुसावळ : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर व वर्धा दरम्यान सुरक्षा तसेच तांत्रिक कामांसाठी काही पॅसेंजर गाड्या महिनाभरासाठी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना महिनाभर त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

नक्की वाचा : रेल्वे विभागाला ‘अल्झायमर’ची लागण 

रेल्वे प्रशासनातर्फे नागपूर ते वर्धा दरम्यान तांत्रिक दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुले भुसावळ-नागपूर पॅसेंजर महिनाभरासाठी रद्द करण्यात आली आहे. तसेच भुसावळ-अमरावती पॅसेंजरही मार्च महिन्यात नऊ दिवस रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ५१२८६ अप नागपूर-भुसावळ व डाऊन ५१२८५ भुसावळ-नागपूर पॅसेंजर २९ फेब्रुवारी ते ३१ मार्च पर्यंत रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ५१२६२ अप वर्धा - अमरावती पॅसेंजर आणि गाडी क्रमांक - ५१२६१ डाउन अमरावती - वर्धा पॅसेंजर १, ७,  ८, १४, १५, २१, २२, २८ आणि २९ मार्चला रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, नागपूर मार्गावरील रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com