भुसावळ पालिकेचा दीडशे कोटींचा अर्थसंकल्प 

busawal palika
busawal palika


भुसावळ : येथील नगरपालिकेच्या १५२ कोटी २३ लाख ८६ हजार ५८९ कोटी रुपयांच्या कुठलीही करवाढ नसलेल्या तसेच ६७ लाख ७० हजार ७४२ रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. 

पालिकेच्या सभागृहात आज (ता. २८) सकाळी अकराला नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. व्यासपीठावर मुख्याधिकारी करुणा डहाळे, गटनेता मुन्ना तेली उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी पालिकेने घनकचरा व्यवस्थापनाचा कर ३६० रुपये करण्यात आला आहे. तो वाढविण्याची पद्धत कशी? याबाबत विचारणा केली असता, नगराध्यक्ष श्री. भोळे यांनी घनकचरा व्यवस्थापन कराबाबत राज्य शासनाचा आदेश राज्यातील पालिकांना बंधनकारक असल्यामुळे अति विलंबाने हा कर लावण्यात आला आहे. यात रहिवासी इमारतींसाठी ३६० तर व्यावसायिक प्रतिष्ठानांसाठी वेगवेगळे दर आकारण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

विशेष सभेत सांडपाणी विल्हेवाट साठी ४ कोटी ५० लाख, नवीन वस्तीतील रस्ते दहा कोटी. रस्ते, ढापे, छोटे पुलांसाठी ५ कोटी. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी ५५ लाख रुपये. भूसंपादन २ कोटी. घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन १ कोटी यासह विविध मुद्यांवर साधारण १५२ कोटी २३ लाख १६ हजार ५८९ रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यात साधारण १५१ कोटी, ५६ लाख १५ हजार ८४७ रुपयांचा खर्च तर ६७ लाख ७० हजार ७४२ रुपयांचा अंदाज पत्रक यावेळी सादर करण्यात आला. 
 
पालिकेचे उत्पन्न 
पालिकेला एकत्रित कर, जलनिःसारण कर, शिक्षणकर, पाणीपट्टी, जाहिरात, जमीन भाडे, इमारत भाडे, क्रीडांगण व इतर भाडे, म्युनिसीपल दवाखाना फी, बांधकाम परवानगी, जन्म मृत्यू नोंदणी, विवाह नोंदणी, विविध अनुदान, पंतप्रधान आवास योजना, अमृत योजना, गुंतवणूक व्याज, विविध भांडवली उत्पन्नातून पालिकेला १४३ कोटी ८८ लाख ९१ हजार ९५० रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. 

पालिकेचा खर्च 
वेतन बँड, ग्रेड पे, महागाई, घरभाडे, वाहतूक भत्ते, इतर मानधन, थकीत वेतन, मूळ पेन्शन, अर्जीत वेतन, फायर फायटर दुरुस्ती व इतर, दिवाबत्ती दुरुस्ती, इलेक्ट्रीकल दुरुस्ती, पथदिवे, डिझेल, औषधी, रोग नियंत्रण, पाणी पुरवठा, रुग्णालय, नगरपालिका शाळा, वाचनालय यासह विविध खर्चासाठी १५१ कोटी ५६ लाख १५ हजार ८४७ रुपयांचा खर्च होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com