भुसावळ नजीक धावत्या मालगाडीला आग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

भुसावळ ः वरणगाव रेल्वेस्थानकाजवळ कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीच्या डब्याला आज अचानक आग लागल्याची घटना घडली. कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ ठळला आहे. 

भुसावळ ः वरणगाव रेल्वेस्थानकाजवळ कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीच्या डब्याला आज अचानक आग लागल्याची घटना घडली. कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ ठळला आहे. 
भुसावळ विभागातून आज (ता.१६) मंगळवारी सकाळी एक मालगाडी नागपूरकडून खंडवामार्गे झाशी येथे जात असतांना या मालगाडीमध्ये कोळसा भरलेला होता. गाडीच्या २५ नंबरचा डबा क्र. (१२१४०३१०७३४) ला आग लागल्याचा प्रकार आचेगाव येथील गेट क्रमांक ४ वर असलेल्या गेटमनच्या लक्षात आल्याने त्यांनी वरणगाव रेल्वे स्टेशनवर याबाबत काळविले. स्टेशन मास्तर यांनी अप सेक्टरमध्ये दुसऱ्या लूप लाईनवर गाडी थांबवली. वरणगाव आयुध निर्माणातील अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर तातडीने पाण्याचा मारा करताच आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे प्रमाण वाढू नये म्हणून वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal railway kolsa fire