भुसावळला दोन दुकाने फोडले 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

भुसावळ ः येथील जामनेर रस्त्यावर असलेल्या अष्टभुजा मंदिरा जवळील दोन दुकाने आज पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी फोडुन गल्यातील रोख रक्कम चोरुन नेली. यातील अष्टभुजा डेअरीत झालेल्या चोरीचे सीसी टिव्ही फुटेज प्राप्त झाले असुन त्या आधारे पोलीस तपास करती आहे. 

भुसावळ ः येथील जामनेर रस्त्यावर असलेल्या अष्टभुजा मंदिरा जवळील दोन दुकाने आज पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी फोडुन गल्यातील रोख रक्कम चोरुन नेली. यातील अष्टभुजा डेअरीत झालेल्या चोरीचे सीसी टिव्ही फुटेज प्राप्त झाले असुन त्या आधारे पोलीस तपास करती आहे. 
याबाबत अधिक माहीती अशी की पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास तीन ते चार चोरटे चार चाकीतुन आले त्यांनी डॉ. विनायक महाजन यांच्या विश्‍वनाथ हॉस्पीटलच्या खाली असलेले मेडीकल दुकान फोडून गल्यातुन तीन हजार रुपये लांबविले. नंतर सामाजिक कार्यकर्ते नितीन धांडे यांच्या अष्टभुजा डेअरीच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन गल्यातील सहा हजार रुपयाची रोकड लांबविली. चोरट्यांनी यावेळी लोखंडी टॉमीचा कुलूप तोडण्यासाठी वापर केला. डेअरीतील मिठाईला किंवा मेडिकल मधील औषधांना चोरट्यांनी हात लावला नाही. 

सीसीटिव्ही फुटेज प्राप्त 
अष्टभुजा डेअरीत बाहेर व आत सीसीटिव्ही कॅमेरे लावलेले आहेत. पहाटे चार वाजता या भागातील रहिवाशी गोटू तांबट घराबाहेर आले तेव्हा त्यांना डेअरीचे शटर अर्धे उघडे दिसले. त्यांनी तात्काळ डेअरीचे मालक नितीन धांडे यांना फोन करुन माहीती दिली. डेअरीच्या वर राहणारे धांडे खाली आले त्यांनी लागलीच सीसीटिव्ही फुटेज पाहुन बाजार पेठ पोलीसांना कळविले. वर्दळीच्या या रस्त्यावर चोरटे चार चाकीतुन आरामात उतरतात, शटरचे कुलूप तोडुन एकजण आत प्रवेश करुन गल्ला पाहतो, गल्यास लॉक असल्याने परत फिरुन टॉमी आणतो, काही सेकंदात गल्ला उघडून त्यातील रोख रक्कम गोळा करुन बाहेर पडतो. सर्व चोरटे गाडीत बसुन रवाना होतात. असे दृश्‍य सीसीटिव्ही फुटेज मध्ये असून याच वेळी बाजुच्या रस्त्याने वाहने धावत असल्याचेही त्यात दिसत आहे. 

पोलिसांची दिरंगाई 
डेअरीचे मालक नितीन धांडे यांनी पाच वाजता पोलिसांना फोन केला त्यानंतर सहा वाजता दुचाकीवर दोन पोलीस आले. त्यांनी बाहेरुनच पाहणी करुन ते निघुन गेले. त्यानंतर पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे अकरा वाजता आले. पोलिसांनी त्वरीत हालचाल केली असती तर चोरट्यांची गाडी सापडु शकली असती. दोन महिन्यापुर्वी जळगाव रोडवर चार चाकीतुन येऊनच एटीएम फोडून रोकड चोरट्यांनी लंपास केली होती. वारंवार घडणाऱ्या चोऱ्यामुळे नागरीक चिंताग्रस्त झाले आहेत. 

गल्यात पैसे कमी 
साधारण रात्री आठ वाजता मी गल्यातील पैसे काढुन घेतो त्यानंतर शिल्लक राहीलेली रक्कम गल्यात उद्यासाठी ठेवली जाते. साधारण सकाळच्या वेळी सुट्या पैश्‍यांची अडचण निर्माण होऊ नये हा त्यामागील उद्देश असतो. काल साधारण सहा हजार रुपये गल्यात होते. असे नितीन धांडे यांनी सांगितले. दोन्ही दुकाने फोडल्या प्रकरणी बाजार पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. 
 

Web Title: marathi news bhusawal shop daroda