esakal | अत्यावश्यक सामुग्रीसाठी धावणारा विशेष रेल्वे

बोलून बातमी शोधा

railway

विशेष पार्सल गाड्यांमध्ये कांकरिया-संकरैल माल टर्मिनल दरम्यान, विशेष पार्सल गाडी उद्या (ता. ३१) ला कांकरियाहुन रात्री पावणे बाराला प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी संकरैल माल टर्मिनलला रात्री आठला पोहचेल.

अत्यावश्यक सामुग्रीसाठी धावणारा विशेष रेल्वे
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. मात्र अत्यावश्‍यक सेवासुविधा सुरळीत करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असून, रेल्वे प्रशासनातर्फे अत्यावश्यक साधन सामुग्री वाहतुकीसाठी विशेष पार्सल गाडी चालविण्यात येणार आहे. ज्यांना सामुग्री पाठवयाची असेल त्यांनी रेल्वे मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्याकडे संपर्क करावा मागणीनुसार गाड्यांची फेरी वाढविण्यात येइल. 

विशेष पार्सल गाड्यांमध्ये कांकरिया-संकरैल माल टर्मिनल दरम्यान, विशेष पार्सल गाडी उद्या (ता. ३१) ला कांकरियाहुन रात्री पावणे बाराला प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी संकरैल माल टर्मिनलला रात्री आठला पोहचेल. तसेच ही गाडी ४ एप्रिल रोजी संकरैल माल टर्मिनलहुन साडे अकराला प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी कांकरियाला सव्वा सहाला पोहचेल. ही गाडी आनंद, वडोदरा, सुरत, जळगाव येथे साडेबारा ते १ वाजता, भुसावळ दीड ते दोन वाजता, नागपुर, गोंदिया, दुर्ग, रायपुर, बिलासपुर, झारसुगडा, टाटानगर, खरगपुर या ठिकाणी थांबेल. करमबेली-चांगसारी दरम्यान विशेष पार्सल गाडी २ एप्रिलला करमबेलीहुन सहाला प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी चांगसारी पाचला पोहचेल. तर ६ एप्रिलला चांगसारीहुन १२ वाजता प्रस्थान करेल आणि तिसरा दिवशी करमबेलीला साडेनऊला पोहचेल. मार्गात वलसाड, उधना, जळगाव अडीच ते तीन, अकोला साडेपाच ते सहा, नागपुर साडेदहा ते साडे अकराला, दुर्ग, रायपुर, बिलासपुर, झारसुगडा, टाटानगर, संकरैल माल टर्मिनल, भट्टा नगर, दनिकुनी, मालदा टाउन, न्यू बोंगाईगांव या ठिकाणी थांबेल. कल्याण- संकरैल माल टर्मिनल (००१०१) डाउन ही गाडी २ आणि ९ एप्रिलला कल्याण स्टेशनहुन साडे आठला प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी संकरैल माल टर्मिनल ला १२ वाजता पोहचेल. (००१०२) अप संकरैल माल टर्मिनल- कल्याण ही गाडी ६ आणि १३ एप्रिलला संकरैल माल टर्मिनल स्टेशन हुन रात्री दहाला प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी कल्याण स्टेशनला सहाला पोहचेल. मार्गात इगतपुरी, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, बडनेरा, नागपुर, दुर्ग, बिलासपुर, झारसुगडा, राउलकेला, टाटानगर या ठिकाणी थांबेल. (००१०३) डाउन कल्याण-न्यू गुवाहाटी स्टेशन गाडी ७ एप्रिलला कल्याणहुन साडे आठला प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी दहाला न्यू गुवाहाटी स्टेशन पोहचेल. (००१०४) अप न्यू गुवाहाटी स्टेशन-कल्याण गाडी १० एप्रिल ला न्यू गुवाहाटी स्टेशनहुन साडे अकराला प्रस्थान करेल आणि १३ एप्रिलला सहाला कल्याण पोहचेल. मार्गात इगतपुरी, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, बडनेरा, नागपुर, दुर्ग, बिलासपुर, झारसुगडा, राउलकेला, टाटानगर, संकरैल माल टर्मिनल, भट्टा नगर, दनिकुनी, मालदा टाउन, न्यू बोंगाईगांव या ठिकाणी थांबेल.